Nashik Crime : दिल्लीच्या बेपत्ता विवाहितेचा गंगापूर धरणात आढळला मृतदेह

Death
Deathesakal
Updated on

Nashik Crime : नाशिकला फिरण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या २८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह शनिवारी (ता. ३०) दुपारी गंगापूर धरणात तरंगताना आढळून आला. विवाहितेच्या भावाने मृतदेहाची ओळख पटविली.

विवाहिता पतीसह उपनगर पोलिसात वास्तव्यास असताना शुक्रवार (ता. २९) पासून ती बेपत्ता होती, तशी नोंद उपनगर पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे. याप्रकरणात नाशिक तालुका व उपनगर पोलिस तपासाला लागले आहेत. (Dead body of Delhi missing married woman found in Gangapur Dam nashik crime news)

आदिती हरेंद्रसिंग राठोड, असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आदिती उपनगर हद्दीतून बेपत्ता झाली होती, तशी नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी दुपारी गंगापूर धरणाजवळील एका रिसॉर्टलगत असलेल्या पाण्यात आदितीचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव पथकासह घटनास्थळी पोचल्या. पोलिसांनी पंचनामा केल्यावर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

Death
Solapur Crime : विवाहितेचा छळ करून खून; रेल्वे स्टेशनवर आढळला मृतदेह, 'तिच्या'जवळ होती चिठ्ठी!

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आदितीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले तर आदितीचा भाऊ अखिल राठोड (रा. दिल्ली) याने मृतदेहाची ओळख पटविली. मात्र उपनगरमधून ती धरणाकडे एकटी कशी आली व तिचा पती कुठे होता, या प्रश्नांचे रात्री उशिरापर्यंत गूढ कायम होते.

आत्महत्या की घातपात?

राठोड दांपत्य दोघे फिरण्यासाठी नाशिकला आले, उपनगर हद्दीत वास्तव्याला होते. मात्र शुक्रवारी सायंकाळपासून आदिती बेपत्ता असल्याचे उपनगर पोलिसांत नोंद करण्यात आलेली आहे.

तर, या दांपत्याच्या पाठोपाठ आदितीचा भावासह काही नातलगही नाशिकमध्ये पोचले. शनिवारी दुपारी आदितीचा मृतदेह आढळल्याने संशय वाढला. आदिती पतीसह असताना ती एकटी धरणाकडे कशी गेली, या घटनेमागे आत्महत्या आहे की घातपात अशी शक्यता व्यक्त होते आहे.

Death
Nashik News : गंगापूर कॅनॉल मध्ये आढळला दुचाकी सह संशयास्पद मृतदेह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.