Nashik Crime : पोहाणे (ता. मालेगाव) शिवारातील शेतातून चार दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय मुलाचा मृतदेह मिळाला. चार दिवसाच्या शोध कार्यानंतर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गळा चिरलेल्या व मातीच्या ढिगाऱ्यात पुरलेला मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णा अनिल सोनवणे (वय ९) असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. (Dead body of missing boy from Pohane found Suspicion of human sacrifice Nashik Crime news)
आदिवासी समजातील अनिल सोनवणे हे कुटुंबियांसह काटवन भागातील पोहाणे शिवारातील शेतात वास्तव्याला आहेत. मोलमजुरी करुन ते गुजराण करतात. १६ जुलैला सकाळी दहाच्या सुमारास कृष्णा शेतात गेला.
सायंकाळपर्यंत कृष्णा घरी परतला नाही. शोध घेऊनही तो मिळून आला नाही. यानंतर त्याचे वडील अनिल सोनवणे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात त्याला पळवून नेल्याची वा अपहरण झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. १६ जुलैपासून त्याचा शोध सुरु होता. गुरुवारी पोहाणे वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील विहिरीजवळील नाला बर्डींगच्या ढिगाऱ्याजवळ बुजलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह मिळून आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ग्रामस्थ व वन विभागाने ही माहिती वडनेर खाकुर्डी पोलिसांना कळवली.घटनेची माहिती मिळताच उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक संजय पवार, नवले सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
वडनेर खाकुर्डी पोलिसांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनाही ही माहिती कळवली. त्यांच्या सूचनेवरुन नायब तहसिलदार महेशकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह ढिगाऱ्याखालून काढून पंचनामा करण्यात आला. त्यावेळी या चिमुकल्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मिळून आला.
गुडघ्यावर दाब देत गळा चिरल्याचा अंदाज असल्याने नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाची स्थिती पाहून चिकित्सेसाठी मृतदेह धुळे येथे पाठविण्यात आला. शवचिकित्सा अहवालानंतर वस्तुस्थिती समजेल. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.