Nashik Crime News: विनामस्तक धड आढळल्याने खळबळ; तीन वर्षीय बालिकेचे धड...

तीन वर्षांच्या बालिकेचा हा मृतदेह असावा, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला
Pune Crime News
Pune Crime Newssakal
Updated on

नाशिकमध्ये द्वारका परिसरातील नानावलीजवळील मोकळ्या जागेमध्ये बालिकेच्या बेवारस मृतदेहाचे श्वापदांनी लचके तोडल्याची घटना काल (सोमवारी) उघडकीस आली आहे. रहिवासी संकुलाबाहेर मस्तक, दोन्ही हात आणि एक पाय नसलेला बालिकेचे धड आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

तीन वर्षांच्या बालिकेचा अतिशय भयावह स्थितीत मृतदेह आढळला आहे. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलिसांना शहजाद शेख या तरुणाने याबाबत माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठ‌वण्यात आला.

Pune Crime News
Election Commission: 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, तृणमूल अन् राष्ट्रवादीला झटका

दरम्यान जवळच स्मशानभूमी असल्यामुळे श्वापदांनी या मृतदेहाचे लचके तोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून, भद्रकाली पोलिस या संदर्भात पुढील तपास करीत आहेत.

Pune Crime News
Babri Demolition: "बाबरी मशीद ना शिवसेनेने पाडली, ना बाळासाहेब ठाकरेंनी"

दोन ते तीन दिवसांपूर्वी या बालिकेचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज शवविच्छेदन करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. तीन वर्षांच्या बालिकेचा हा मृतदेह असावा, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर व्यक्त केला. आढळून आलेल्या धडावर कोणत्याही जखमा नसल्याचे आढळून आले, मृतदेह पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

Pune Crime News
Election Commission: 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, तृणमूल अन् राष्ट्रवादीला झटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()