Scholarship News : परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा आधार; ‘सारथी’ची शुक्रवारपर्यंत मुदत

Scholarship Exam Study Tips
Scholarship Exam Study Tipssakal
Updated on

Scholarship News : विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे पाठबळ मिळेल. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्‍या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत बुधवार (ता. ३०)पर्यंत आहे; तर ‘सारथी’च्‍या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी शुक्रवार (ता. १)पर्यंत मुदत असेल. पदव्‍युत्तर पदवी, पदव्‍युत्तर पदविकेसह डॉक्‍टरेटकरिता ही शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी असेल.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्‍या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना कार्यरत आहेत. (deadline for applying under Sarathi scheme will be till 1 sep nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता शिष्यवृत्ती निवडीसाठी अर्ज स्वीकृती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने संकेतस्‍थळावर अर्ज भरून प्रमाणपत्रे व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत आहे.

कला, वाणिज्‍य, विज्ञान व विधी शाखेंतर्गत अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्‍या उमेदवारांना त्‍यांच्‍या जिल्‍ह्यातील उच्चशिक्षणाच्‍या सहसंचालक विभागीय कार्यालय येथे आणि व्‍यवस्‍थापन, अभियांत्रिकी, वास्‍तुकलाशास्‍त्र व औषधनिर्माणशास्‍त्र शाखेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्‍या सहसंचालक विभागीय कार्यालयात ऑनलाइन अर्जाची प्रत, मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे त्‍यांच्‍या साक्षांकित प्रतींसह पडताळणीसाठी सादर करायचे आहेत. त्‍यासाठी गुरुवार (ता. ३१)पर्यंत मुदत आहे.

४० विद्यार्थ्यांना संधी

कला, वाणिज्‍य, विज्ञान, व्यवस्‍थापन, विधी व औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी व पदव्‍युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रत्‍येकी तीन, तर डॉक्‍टरेटसाठी प्रत्‍येकी एका विद्यार्थ्याची निवड केली जाईल. अभियांत्रिकी/वास्‍तुकला शास्‍त्र शाखेत पदव्‍युत्तर पदवी, पदव्‍युत्तर पदविकेसाठी १२ आणि डॉक्‍टरेटसाठी चार जागा अशा एकूण ४० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे बळ दिले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Scholarship Exam Study Tips
Scholarship : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा

‘सारथी’तर्फे ७५ विद्यार्थ्यांची होणार निवड

राज्‍यातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना उपलब्‍ध आहे. त्‍यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्‍था (सारथी) यांच्‍याकडे अर्ज सादर करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शुक्रवार (ता. १)पर्यंत मुदत आहे. अर्जाची प्रत व आवश्‍यक कागदपत्रे सारथी कार्यालयात ४ सप्‍टेंबरपर्यंत सादर करता येतील. पदव्‍युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रम आणि डॉक्‍टरेट अशा दोन स्‍तरांवरील अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना संधी उपलब्‍ध असेल.

यात अभियांत्रिकीसाठी २०, विज्ञान १०, वास्‍तुकलाशास्‍त्र वाणिज्‍य/अर्थशास्‍त्र, कला, विधी या प्रत्‍येक शाखेतील अभ्यासक्रमासाठी प्रत्‍येकी चार आणि व्‍यवस्‍थापन व औषधनिर्माणशास्‍त्र शाखेत प्रत्‍येकी दोन अशा एकूण ५० जागा उपलब्‍ध असतील. डॉक्‍टरेटसाठी एकूण २५ अशा एकूण ७५ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळेल.

Scholarship Exam Study Tips
Foreign Scholarship : सारथीची परदेशी शिष्यवृत्ती प्रक्रिया लवकरच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.