Nashik : डिप्‍लोमा प्रवेश अर्जाची 30 जूनपर्यंत मुदत

Admission
Admissionesakal
Updated on

नाशिक : दहावी उत्तीर्ण (SSC Passed) विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (Diploma) अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. शैक्षणिक वर्ष (Education Year) २०२२-२३ च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. प्रवेशप्रक्रियेच्‍या (Admission) पुढील टप्प्‍यात कॅप राउंडच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जातील. (Deadline for Diploma Admission is 30th June nashik education news)

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाते आहे. त्‍यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. तंत्रशिक्षणात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्‍लोमाचा पर्याय निवडता येणार आहे. हा शिक्षणक्रम पूर्ण केलेल्‍या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्‍या थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळविता येणार आहे. प्रवेशप्रक्रियेंतर्गत गुणवत्तायादी प्रसिद्धी तारखेपर्यंतचे वेळापत्रक जारी केले आहे. या वेळापत्रकातही आवश्‍यकतेनुसार बदल होण्याची शक्‍यता आहे. या वेळापत्रकानुसार ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. ई- स्क्रू‍टीनी किंवा प्रत्‍यक्षात कागदपत्रे पडताळणीसाठीदेखील हीच मुदत लागू असेल. प्रारूप गुणवत्तायादी ३ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. हरकती नोंदविण्यासाठी ४ ते ६ जुलैपर्यंत मुदत असेल. तर अंतिम गुणवत्तायादी ७ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे.

Admission
26/11 हल्ला : नांगरे पाटलांच्या बॉडीगार्डला बाहेर आणणारे जगदेवप्पा झाले PSI

नाशिक विभागातील उपलब्‍ध जागा

जिल्‍हा पॉलिटेक्निक उपलब्‍ध जागा

नाशिक २४ आठ हजार ५२०

नगर २७ सात हजार ३२४

धुळे दहा दोन हजार ५०३

जळगाव १५ तीन हजार ६७२

नंदुरबार तीन ७२०

एकूण ७९ २२ हजार ७३९

Admission
स्‍किल सेंटरसाठी DPDCतून पाच कोटी : पालकमंत्री भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.