E-Crop Inspection: ई-पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

farmer e-crop inspection
farmer e-crop inspectionesakal
Updated on

E-Crop Inspection : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदवलेला नसल्याने ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Deadline for E Crop Inspection September 15 nashik)

शेतकऱ्यांना आपल्या शेतात पीक पाहणी या मोबाईल ऍपद्वारे पीकपेरा नोंदवता येतो. यासाठी शेतकऱ्यांना शेतातील विविध पिकांची आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत होती.

मात्र मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता या ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पीक विम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.

पीक शेतात आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. पण ही पाहणी करताना ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन असणे, अॅप लोड न होणे, अंतिम अहवाल न येणे अशा अडचणी येत होत्या.

यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नसल्याच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना यामुळे संधी मिळणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

farmer e-crop inspection
Nashik: येवल्यातील क्रांतीस्तंभाला मिळणार झळाळी! दराडे बंधूच्या पुढाकाराने सुशोभीकरणासह रस्ता कामाला निधी

यावर्षी राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला आहे. आता विम्याचा लाभ मिळण्यासाठी जे पीक विमा करताना नोंदवले आहे.

त्यांना पिकाची ई-पीक पाहणीमध्ये नोंद होणे गरजेचे आहे. पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये पीक बिमा,पीक कर्ज,शासकीय अनुदान,अतिवृष्टी अनुदान इत्यादी विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत पर्याय देण्यात आलेला असून मदत कक्ष क्रमांक ०२२-२५७१२७१२ या दूरध्वनी क्रमांकावर देखील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संपर्क करून निरसन करून घेता येणार आहे.

farmer e-crop inspection
Mother Milk Bank: जिल्हा रुग्णालयात ‘मदर मिल्क बँक’ स्थापणार : पालकमंत्री पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()