Recertification Meters : रिक्षा मीटर पुन:प्रमाणिकरणास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Autorickshaw
Autorickshawesakal
Updated on

नाशिक : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा परवानाधारकांना देण्यात आलेल्या भाडेवाढीस अनुसरून रिक्षा मीटरचे ३१ जानेवारीपर्यंत पुन:प्रमाणिकरण करणे आवश्यक होते. (deadline for recertification of rickshaw meter extended till April 30 by Regional Transport Authority nashik news)

परंतु बहुतांश रिक्षांच्या मीटरचे पुन:प्रमाणिकरण झाले नसल्याने मीटर पुन:प्रमाणिकरणास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी दिली आहे.

मुदतवाढ दिलेल्या कालावधीत रिक्षा मीटरचे पुन:प्रमाणिकरण न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन करण्यात येईल. परवाना निलंबन कालावधी किमान सात दिवस व कमाल ४० दिवसांचा राहील.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Autorickshaw
Nashik News : प्रभाग एकमध्ये जागोजागी CCTV!

त्याचप्रमाणे परवाना निलंबन ऐवजी तडजोड शुल्क मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये आकारण्यात येईल. तडजोड शुल्क किमानपाचशे रुपये व कमाल रुपये दोन हजारपेक्षा अधिक असणार नाही, असेही प्रदिप शिंदे यांनी सांगितले आहे.

रिक्षा परवानाधारकांनी मीटर नविन दराप्रमाणे सुधारित करून घेण्यात यावे. तसेच मोटार वाहन अधिनियमानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ मेपासून राबविण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी केले आहे.

Autorickshaw
NDCC Bank Recovery : ते पत्र पडतंय भारी! जिल्हा बॅंकेची आठवड्यात अवघी 4 टक्केच वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.