नाशिक : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या (Department of School Education and Sports) सर्व योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचा ‘डेटाबेस' करून तो आधारशी संलग्न करायचा आहे. त्यासाठी डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीशी (Scholarship) प्रत्येक योजना आधारशी संलग्न करून १ जानेवारी २०२३ पासून डीबीटी (DBT) मार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. (Deadline for school education sports department beneficiary Aadharlink till December Nashik News)
पोषण आहार, शिक्षण हक्क अधिनियमातंर्गत दुर्बल-वंचित घटकांसाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आणि वैयक्तिक लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या जातात. विविध सवलती व वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शी पोचण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार योजनांशी संबंधित सर्व लाभार्थी आधारशी जोडून १ जानेवारी २०२३ पासून संबंधित योजनांना निधी दिला जाणार आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी आणि नियमित उपस्थितीची माहिती वेबबेस्ड ॲप्लीकेशनच्या माध्यमातून करायची आहे. त्यासाठी मास्टर डेटा बेस अद्ययावत ठेवण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत बंधनकारक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.