Nashik News : कौशल्‍य मागणी सर्वेक्षण सहभागासाठी सोमवारपर्यंत मुदत; यावर करा नोंदणी

Skill Demand Survey participation
Skill Demand Survey participationsakal
Updated on

Nashik News : नोकरी, स्‍वयंरोजगारासाठी कौशल्‍याधिष्ठीत मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. त्‍या अनुषंगाने राज्‍यस्‍तरावर सध्या कौशल्याची मागणी सर्वेक्षण आणि उद्योगांच्या मनुष्यबळात कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहीम राबविली जात आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सोमवार (ता. ३१)पर्यंत मुदत दिलेली आहे. उमेदवारांच्‍या सूचनांनुसार कौशल्‍य विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्‍ध करून दिला जाईल. (Deadline for Skill Demand Survey participation is 31 july nashik news)

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी राज्यात कौशल्य विकास उपक्रमांची अंमलबजावणी व संनियंत्रण करते. त्‍यांच्यामार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविल्‍या जातात.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान आणि किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे.

या अंतर्गत युवक-युवतींना मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी कौशल्याची मागणी सर्वेक्षण मोहीम राबविली जाते. मोहिमेंतर्गत सर्वेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार केलेला आहे. https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 या लिंकद्वारे उमेदवारांना त्‍यांची मागणी नोंदविता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Skill Demand Survey participation
Nashik News : खुशखबर! आता रेशनकार्डधारकांना मिळणार जिल्ह्यातील रुग्णालयात मोफत उपचार; जाणून घ्या सविस्तर...

राज्यातील युवक-युवतींना उद्योगांच्या मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी उद्योगांच्या मनुष्यबळात कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहिमेचे आयोजन केले आहे. मोहिमेत https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWk9 या लिंकद्वारे गुगल फॉर्म भरता येईल. जिल्ह्या‍तील युवक-युवतींना सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणातून गळती झालेले, शिक्षण सोडलेले, नोकरीच्या शोधातील उमेदवार, वंचित घटकातील उमेदवारांनी कौशल्याची मागणी सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

निर्धारित मुदतीत सर्वेक्षणांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या सहाय्यक आयुक्‍त अनिसा तडवी यांनी केले आहे.

Skill Demand Survey participation
Nashik News : जिल्ह्यातील 4 धरणांमधून पहिला विसर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.