MPSC Pre-Training : ‘एमपीएससी’ पूर्व प्रशिक्षणासाठी सोमवारपर्यंत मुदत

MPSC
MPSC esakal
Updated on

नाशिक : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)तर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्‍यासाठी इच्‍छुकांना येत्‍या सोमवार (ता. १०)पर्यंत नोंदणीची मुदत आहे. (Deadline till Monday for MPSC Pre Training nashik news)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

MPSC
NIMA Power : ‘निमा पॉवर’मुळे नाशिकमध्ये मोठे उद्योग येणार : राधाकृष्ण गमे

महाज्योतीच्या नाशिक विभागीय अधिकारी सुवर्णा पगार यांनी ही माहिती दिली. पदवीच्या अंतिम वर्षातील, तसेच पदवी पूर्ण केलेले ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल.

राज्यभरातील एकूण दीड हजार पात्र उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अकरा महिन्‍यांचे हे प्रशिक्षण असून, उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन व एकूण बारा हजारांचा आकस्मिक निधी मिळणार आहे. इच्‍छुक व पात्र उमेदवारांनी संकेतस्‍थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

MPSC
Nashik News : जिल्ह्यातील 100 कलावंतांचे मानधन मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.