Syllabus Completion
Syllabus Completionesakal

Nashik News : सत्र पूर्ण करण्याची हुकणार Deadline!; अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्‍हान

Published on

नाशिक : कोरोना महामारीमुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्षाचे नियोजन अद्याप सुरळीत झालेले नाही. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता सत्र पूर्ण करण्यासाठीचे वेळापत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जारी केले आहे. परंतु, पहिल्‍या सत्रातील परीक्षा घेण्यासह पुढील सत्रातील अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून पुन्‍हा परीक्षा घेण्याचे आव्‍हान महाविद्यालय प्रशासनासमोर असणार आहे. त्यामुळे यंदाही सत्र पूर्ण करण्यासाठी निर्धारित डेडलाइन हुकणार असल्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. ( Deadline to complete session to SPPU challenge to complete syllabus Nashik News)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या सत्र पूर्तीसंदर्भातील वेळापत्रक जाहीर झाले होते. त्‍यानुसार काही अभ्यासक्रमाच्‍या पहिल्‍या सत्रातील प्रक्रिया ही नोव्‍हेंबर, तर काहींची डिसेंबरमध्ये संपणे अपेक्षित होते. मात्र प्रत्‍यक्षात पहिल्‍या सत्राची अध्यापन प्रक्रियाच पूर्ण झालेली आहे.

आता विद्यार्थ्यांना अभ्यासाला अवधी देऊन लेखी परीक्षा घेतली जाणार असून, ही प्रक्रिया जानेवारीअखेरपर्यंत चालणार आहे. त्‍यानंतर पुन्‍हा पुढील सत्राच्‍या अध्यापनाला सुरवात करत, विहित मुदतीत अभ्यासक्रम शिकवायचा आहे व दुसऱ्या सत्रातील लेखी परीक्षा घ्यायची असल्‍याने, त्‍यासाठी जून, जुलै उजाडणार असल्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

प्रथम वर्षाच्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय

नियमित विद्यार्थ्यांची विलंबाने का होईना प्रक्रिया पार पडत आहे. परंतु, प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. पदवीस प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष पाया समजला जातो. त्यामुळे घाईत अध्ययन करताना पायाच कच्चा राहिला, तर पुढील वर्षांमध्ये त्‍याचा नकारात्‍मक परिणाम होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Syllabus Completion
Nashik ZP News : सुरगाण्याच्या मूलभूत सुविधांसाठी झेडपीचा Action Plan!

फार्मसीचे अद्याप प्रवेशच नाहीत

औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम (बी.फार्मसी) आणि पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम (एम. फार्मसी) यांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुढील काही दिवस ही प्रक्रिया चालणार असून, त्‍यानंतर अध्ययन प्रक्रिया सुरू होईल. या शाखेतील अभ्यासक्रम प्रात्‍यक्षिकांवर आधारित असल्‍याने केव्‍हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि परीक्षा घ्यायच्‍या कधी, असा प्रश्‍न महाविद्यालय प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

थेट द्वितीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांपुढे आव्‍हान

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्‍या पदवी अभ्यासक्रमाच्‍या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिले जातात. पदविका उत्तीर्ण विद्यार्थी त्‍यासाठी पात्र ठरतात. ४ डिसेंबरला प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी त्‍यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचे आव्‍हान प्राध्यापकांवर असणार आहे.

Syllabus Completion
SAKAL Special : गायरानावरील अतिक्रमणांबाबत प्रशासनाचे मौन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()