Nashik News : पांजरपोळ येथील दीडवर्षीय पिल्लाचा मृत्यू; अत्यवस्थ उंटावर उपचार सुरू

Death of one and half year old camel from Panjrapole nashik news
Death of one and half year old camel from Panjrapole nashik newsesakal
Updated on

Nashik News : पंचवटी तपोवन येथून ४ मेस प्राणीमित्र तथा ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर मुंबई हायकोर्ट जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम आव्हाड यांनी ८२ उंटांना ताब्यात घेतले होते. तर ५ मेस म्हसरूळ परिसरातून २९ उंट पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते. (Death of one and half year old camel from Panjrapole nashik news)

ताब्यात घेतलेल्या १११ उंटांना शहरातील पांजरपोळ येथे पाठवण्यात आले. यातील १८ उंट अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले होते. यातील दोन उंटांचा मृत्यू झाला होता, तर मंगळवारी साधारण दीडवर्षे वय असलेल्या उंटाच्या पिलाचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता पांजरपोळ येथील उंटाची संख्या १०८ आहे. यामधील अजूनही अत्यवस्थ उंटावर उपचार सुरू आहे.

हा प्रकार उंट तस्करीचा असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत असून उंट तस्करीचे नाशिक शहर केंद्रबिंदू तर नाही ना, असा प्रश्न प्राणीमित्रांमधून उपस्थित करण्यात येत आहे. राजस्थानमधून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यात उंटाची तस्करी केली जात असल्याची माहिती राजस्थानमधील एका सामाजिक संस्थेतर्फे राज्यपालांना देण्यात आली असल्याचे समजते.

राज्यपालांनी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करत जिल्हाधिकारी व पशुकल्याण विभागास दक्षतेचे पत्र दिल्याचे समजते. या उंटांना दिंडोरी येथून नाशिकला आणल्यामुळे यांची वाहतूक करणाऱ्या संशयितांवर दिंडोरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तर मालेगाव येथील पडळदे गावाजवळील कळवाडी पुन्हा रस्त्यावर ४३ उंट ताब्यात घेत संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death of one and half year old camel from Panjrapole nashik news
NMC News: महापालिका लेखा परिक्षण विभागाचे खासगीकरण! द्विनोंद लेख्यांचे बाह्य संस्थेकडून लेखा परिक्षण

एकीकडे ग्रामीण पोलिस हद्दीतील दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो, मालेगाव येथे गुन्हा दाखल होऊ शकतो, मात्र नाशिक शहरातील एकही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याने हे गौडबंगाल काय या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पुरुषोत्तम आव्हाड, रमेश मानकर, गजू घोडके, चंदन भास्करे आणि संपूर्ण गोरक्षा टीमने शहर पोलिसांनीदेखील याबाबत गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी केली आहे.

मनपा व पशू वैद्यकीय अधिकाऱ्यास दिले पत्र

गुरुवार (ता.४) तपोवन येथे उंट दाखल झाले होते. त्या वेळी आडगाव पोलिस ठाण्यामार्फत मनपा कार्यालयास याबाबत सूचनापत्र देण्यात आले होते. तसेच पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनादेखील पत्र देण्यात आले होते. त्यांनतर सदर उंट हे भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत पुढे गेले.

Death of one and half year old camel from Panjrapole nashik news
Nashik News: वाघाडी पुलाचे कठडे ठरताहेत भुरट्यांचे ‘लक्ष्य’! कारवाईची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.