Nashik News : 'त्या' गरोदर महिलेचा डोक्यात अतिरक्तस्त्राव, रक्तदाब वाढल्याने मृत्यू; महिला आयोगाकडे अहवाल सादर

death of pregnant woman was due to excessive bleeding and an increase in bp nashik news
death of pregnant woman was due to excessive bleeding and an increase in bp nashik newsesakal
Updated on

Nashik News : जुनवणेवाडी (ता. इगतपुरी) येथील वनिता भगत या सात महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू हा तिच्या डोक्यात अतिरक्तस्त्राव व त्यातच रक्तदाब (बीपी) वाढल्याने झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने म्हटले आहे.

राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तातडीने अहवालाची मागणी केली होती. त्या अहवालात मृत्यूची वरील कारणे नमूद केली आहेत. (death of pregnant woman was due to excessive bleeding and an increase in bp nashik news)

जुनवणेवाडी ते तळोघ हा दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर चालणे अवघड होते, तेव्हा गाडी जाण्याचा प्रश्नच नाही. गेल्या आठवड्यापासून या भागात रिमझिम पाऊस सुरू असल्याने अर्धा रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. अशा बिकट परिस्थितीत जुनवणेवाडी येथील वनिता भगत (वय २०) या सात महिन्यांच्या गरोदर होत्या.

मंगळवारी (ता. २५) दुपारी त्यांना उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्या गणेशवाडीला माहेरी पायी जाण्यासाठी निघाल्या. पण, रस्ता अत्यंत खराब असल्याने त्यांना अधिक त्रास झाला. त्या कशाबशा तळोघ या गावापर्यंत पोहोचल्या. येथे त्यांना घेण्यासाठी गाडी आली. तळोघ येथून गणेशवाडीला रात्री पोहोचल्या; पण त्यांचा त्रास काही कमी झाला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

death of pregnant woman was due to excessive bleeding and an increase in bp nashik news
Nashik News : प्रसूतिवेदना सहन करीत महिलेची अडीच किलोमीटर पायपीट! मृतदेह नेण्यासाठी करावी लागली डोली...

अखेर गणेशवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून संदर्भपत्र घेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यापूर्वीच पोटातील बाळासह या मातेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

शवविच्छेदन अहवाल ठेवला राखून

महिलेच्या मृत्यूची कारणे शोधत आरोग्य विभागाने वनिता भगत यांची संपूर्ण वैद्यकीय फाईल पाहिली असता त्यांना मिरगी येत असल्याची कुठेही नोंद नाही. पण, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी वनिताला मिरगी येत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाने महिला आयोगाकडे अहवाल सादर केलेला असला, तरी जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला आहे.

death of pregnant woman was due to excessive bleeding and an increase in bp nashik news
PM Kisan Sanman Yojana : राज्यातील 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज 'इतके' कोटी रुपये होणार जमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.