Nanded Hospital Deaths : नांदेडमधील ‘त्या’ रुग्णांचा मृत्यू औषधांअभावी नाही; आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त

Nanded Hospital Deaths : नांदेडमधील ‘त्या’ रुग्णांचा मृत्यू औषधांअभावी नाही; आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त
Updated on

Nanded Hospital Deaths : नांदेड येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करीत उपलब्ध औषधसाठ्याची माहिती घेतली.

डॉ. पवार यांनी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तीन दिवसांत ३७ रुग्णांचा मृत्यू औषधांअभावी झालेला नाही. (death of those patients in Nanded is not due to lack of medicines health department received report news)

तसा अहवाल केंद्रीय आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याची माहिती दिली. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनीही जिल्हा रुग्णालयाची पाहणी करीत दक्षता बाळगण्याबाबतच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसह औषधसाठा व कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नांदेड येथील घटना दुर्दैवी असल्याचे सांगत नवजात बालक इमर्जन्सी व्हेंटिलेटरवर असतानाच त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले होते. तेथील घटनेचा समितीमार्फत अहवाल प्राप्त होणार आहे.

प्राथमिक अहवालानुसार रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे वय जास्त होते, तर अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ अवस्थेत या रुग्णालयात दाखल झाले होते.

Nanded Hospital Deaths : नांदेडमधील ‘त्या’ रुग्णांचा मृत्यू औषधांअभावी नाही; आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त
Nanded Hospital Deaths: नांदेडमधील बालकांच्या मृत्यूला खासगी रुग्णालयेच जबाबदार; मुश्रीफांचा गंभीर आरोप

औषधे नसतील तर मागणी केल्यास केंद्राकडून औषधे उपलब्ध करून दिली जातात, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या खाटा वाढविण्याची गरज आहे. अतिदक्षता विभागाच्या खाटा ८० करण्यात येतील, डॉ. पवार यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून पाहणी

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता. ५) सायंकाळी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेत पाहणी केली. या वेळी रुग्णालयात असलेल्या उपलब्ध औषधसाठ्याची माहिती घेतली असता तो पुरेसा असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

Nanded Hospital Deaths : नांदेडमधील ‘त्या’ रुग्णांचा मृत्यू औषधांअभावी नाही; आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त
Nanded Hospital Deaths: नांदेडच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल केंद्राला सादर; भारती पवारांनी दिली महत्वाची अपडेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.