Nashik News : 23 ते 25 हून अधिक शर्यती जिंकलेल्या योद्धा बैलाचा मृत्यू; कुटुंबीयांकडून दशक्रिया विधी

सिन्नर शहरातील खळवाडी येथील गोळेसर कुटुंबातील सुनील रामनाथ गोळेसर व अमोल गोळेसर तसेच ज्वालामाता ग्रुप यांच्या लाडक्या बैलाचा सहा जानेवारी रोजी आकस्मित मृत्यू झाला.
Rewards and honors in bullock-cart races with the ever-undefeated warrior Super King Vaghya
Rewards and honors in bullock-cart races with the ever-undefeated warrior Super King Vaghyaesakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर शहरातील खळवाडी येथील गोळेसर कुटुंबातील सुनील रामनाथ गोळेसर व अमोल गोळेसर तसेच ज्वालामाता ग्रुप यांच्या लाडक्या बैलाचा सहा जानेवारी रोजी आकस्मित मृत्यू झाला.

सुनील गोळे सर व अमोल गोळे सर या शेतकऱ्याने त्यांच्या बैलाच्या मृत्यूनंतर त्याची दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य पूर्ण करण्यासाठी मकर संक्रातीच्या दिवशी 15 जानेवारी रोजी विधिवत पूजा करणार आहे. (Death of warrior bull that has won more than 23 to 25 races in sinnar nashik news)

तसेच ज्वालामाता ग्रुपचे सर्व बैलगाडा संघटना हे मुंडन करणार असून ही खूप मोठी बाब असल्याचे बोलले जात आहे. बैलाच्या मृत्युने घरातील एखादा कर्ता व्यक्ती दगावल्याचे दुःख गोळेसर कुटुंब व ज्वाला माता बैलगाडा संघटना कुटुंबीयांना झालं. बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गोळेसर कुटुंबीयांनी त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले.

माणसाचा निधन झालं की त्याचा दहावा विधी आणि उत्तर कार्य केले जातात. त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातील गावात शेतकऱ्यांचे त्याच्या लाडक्या बैलाचा निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी येत्या मकर संक्रांतीच्या दिवशी 15 जानेवारी रोजी उत्तरकार्य करणार आहे.

या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारीच लाडक्या वाघ्या सुपर किंग बैलाचा निधन झाल्यानंतर दफन विधी केला आणि त्यानंतर दहावा विधी आणि उत्तरकार्य देखील करणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित राहणार असल्याचे गोळेसर कुटुंबीय व ज्वाला माता बैलगाडा संघटना यांनी सांगितले आहे हे सर्व सांगताना सुनील गोळे सर व अमोल गोळे सर हे भावनिक झालेले होते.

Rewards and honors in bullock-cart races with the ever-undefeated warrior Super King Vaghya
Nashik Leopard News : धावत्या दुचाकींवर बिबट्यांचा हल्ला; 4 जण जखमी

त्यांच्या डोळ्यातून वाघ्याचे प्रेम हे अश्रुद्वारे निघत होते. अतिशय गुलामी व कुटुंबाप्रमाणे तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपलेल्या या वाघ्या बैलाचे अचानक जाण्याने गोळेसर कुटुंबियांवर खूप मोठा आघात झालेला आहे.

दोन वर्ष दिली शेतकऱ्याची साथ

शेतकऱ्याचा जीवाभावाचा खरा मित्र म्हणजे शेतीत काबाडकष्ट करणारा बैल. सिन्नर तालुक्यातील खळवाडी येथील गोळेसर कुटुंबियातील अशाच एका मायाळू बैलाने वयाची तब्बल 2 वर्ष इमानेइतबारे प्रपंचाचा गाडा ओढत शेतकऱ्याला साथ दिली. सहा जानेवारी रोजी अकस्मात याचे निधन झाले या वाघ्या नावाच्या बैलाचा दुर्देवी अंत झाला.

सुनील रामनाथ गोळेसर व अमोल गोळेसर यांनी पोटच्या मुलाप्रमाणे बैलाचा सांभाळ केला. त्यांनी प्रेमाने त्याचे नाव सुपर किंग वाघ्या असे ठेवले. जसजसे दिवस सरत गेले तस तसा वाघ्या मालकाची पत राखण्याकरता वाघ्या सुपर किंग बैलगाडा शर्यतीत जीव तोडून धाऊ लागला.

Rewards and honors in bullock-cart races with the ever-undefeated warrior Super King Vaghya
Nashik Accident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बैलगाडा शर्यतीत अनेक विक्रम, 24 ते 25 हून अधिक शर्यती जिंकल्या तसाच तो अपराजित योद्धा ठरला. बैलगाडा शर्यतीत अगदी कमी वेळात धावण्याचे वाघ्याने कमी वयात अनेक विक्रम केले. त्यामुळे पंचक्रोशीत सुपर किंग वाघ्या प्रसिद्ध झाला. तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक बैलगाडा शर्यतीत फायनल सम्राट म्हणून वाघ्याने अनेक बक्षिसे मिळविली. जवळपास 26 हून अधिक शर्यती या वाघ्या बैलाने जिंकला असल्याच्या गोळेसर यांनी सांगितले.

वाघ्या सुपर किंग ने सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे झालेल्या शर्यतीमध्ये शेवटच्या क्षणी शर्यत जिंकून वासरू म्हणून त्याने बक्षीस जिंकले आणि तो अतिशय अपरिचित योद्धा ठरला. प्रामाणिकपणे त्याने आपले कार्य केले यामुळे शेवटची भेट देणे जाता जाता वासरू म्हणून आपल्या मालकाला आठवण म्हणून ठेवली असे गोळेसर कुटुंबियांनी सांगितल्या क्षणी भावनिक झाले होते.

बैलाच्या कृतज्ञतेपोटी गोळेसर यांनी बैलाच्या निधनानंतर त्यांच्या घराशेजारी त्याचा दफनविधी केला. त्यानंतर सिन्नर येथे दहावा विधी व उत्तर कार्य देखील करणार असून सर्व ज्वालामाता बैलगाडा संघटना मुंडन करणार आहे. यावेळी त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिले आहे. या कार्याला पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित राहणार आहेत..

Rewards and honors in bullock-cart races with the ever-undefeated warrior Super King Vaghya
Nashik Onion News : ‘कांदाप्रश्नी निदान नाहीच; मात्र उपचार जालीम’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.