सामोपचार कर्ज परतफेड योजना जून अखेरपर्यंत

NDCC Bank
NDCC Bankesakal
Updated on

नाशिक : थकबाकीदार कर्जदारांकडील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (NDCC) राबविलेली समोपचार कर्ज परतफेड योजना (Debt repayment Scheme) ३० जूनपर्यंतच असल्याचे बँकेकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे सभासदांनी तातडीने योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Debt repayment plan by the end of June of NDCC Bank Nashik News)

NDCC Bank
Nashik : तब्बल 821 दिवसांनंतर फाळके स्मारक खुले

थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल देण्यासाठी प्रोत्साहनात्मक बाब म्हणून बँक प्रशासनाला नवीन सुधारित आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजना राबविण्यास नाबार्ड व सहकार आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली. त्यानुसार ३० जूनपर्यंत योजनेची अंतिम तारीख ठरविण्यात आले. त्यानुसार ३० जून २०२१ पर्यत होती. परंतु, सदरची सामोपचार कर्ज परतफेड योजनेची अंतिम मुदत ३० जून २०२२ रोजी संपत असल्याने ज्या थकबाकीदार सभासदांनी अजूनही बँकेच्या समोपचार कर्ज परतफेड योजनेत सहभाग घेतलेला नाही, त्या थकबाकीदार सभासदांनी ३० जूनपर्यंत योजनेत सहभागी होऊन सामोपचार कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ३० जून २०१७ अखेर थकबाकीदार सभासदांना थकबाकी भरण्यासाठी ४ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NDCC Bank
Nashik : जागतिक योगा दिनानिमित्त अमित शहा जिल्हा दौऱ्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.