NMC News : हैदराबादच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा पुनर्विकास; MTDC कडे 50 कोटींची मागणी

Phalke Smarak
Phalke Smarakesakal
Updated on

नाशिक : महापालिकेच्या (NMC) वतीने दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (decided to redevelop Dadasaheb Phalke Memorial on lines of Hyderabad Ramoji Film City on behalf of Municipal Corporation nashik news)

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास केला जाणार असून त्यासंदर्भात महापालिकेने आज स्वारस्य बेकार मागविण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडून चित्रनगरीच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांची मागणी पत्रअन्वये करण्यात आली आहे.

लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क व बाह्य वळण रस्त्यांवर ट्रक टर्मिनस योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन नियमाच्या चौकटीत बसवत महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रकल्पांना आश्वासित गती देण्यासाठी अंदाजपत्रकात समावेश केला.

त्याचबरोबर पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाला उर्जेतावस्था प्राप्त करून देण्यासाठी देखील तातडीने पावले उचलण्यात आली आहे. सन 1999 मध्ये पाथर्डी शिवारातील पांडवलेण्याच्या पायथ्याशी 29 एकर जागेत चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक तयार करण्यात आले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Phalke Smarak
RTE Admission : इगतपुरी तालुक्यात आरटीई अंतर्गत प्रवेशास सुरवात; या तारखेपर्यंत मुदत

स्मारकाची देखभाल व दुरुस्ती खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर दुरावस्था सुरू झाली. मागील वर्षी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी अंदाजपत्रकात योजनेचा समावेश केला. पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आले परंतु तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खाजगीकरणाच्या प्रक्रियेला विरोध केला.

त्यानंतर स्वनिधीतून प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला. चालू आर्थिक वर्षाचा अंदाजपत्रक महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी नुकतेच सादर केले त्यात हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर दादासाहेब फाळके स्मारकाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यासाठी बांधकाम विभागाच्या वतीने शनिवारी (ता. ४) स्वारस्य देकार मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.

एमटीडीसी कडून 50 कोटी

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या बाबतीवर फाळके स्मारकाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे 50 कोटी रुपयांचा निधी मागितला आहे या संदर्भातील पत्र एमटीडीसीकडे पाठवण्यात आले असून फिल्म सिटीच्या धर्तीवर सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.

Phalke Smarak
Nashik News : देशातील जुन्या संचांचे आधुनिकीकरण; 2030 पर्यंत संच चालविण्याचे CEAचे निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.