Nashik ZP News: जि. प. शिक्षणाधिकारी कोण यांचा गुरुवारी होणार फैसला

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik ZP News: जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याने प्रशासनाने त्यांचा पदभार काढून घेतला आहे. दुसरीकडे वैद्यकीय रजा संपल्याने पाटील सोमवारी (ता. १३) हजर झाले.

मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल रजेवर असल्याने गुरुवारी (ता. १६) त्या हजर झाल्यानंतर पाटील यांच्या माध्यमिक पदभाराबाबत फैसला होणार आहे. त्यामुळे हजर झालेले पाटील यांना पदभारविना कार्यालयात हजर होते. (decision of zp education officer will be made on Thursday nashik news)

महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समिती संस्थेत शासकीय नियम डावलून ४० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी श्री. पाटील यांच्याविरोधात भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर ते वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यानंतर त्यांचा माध्यमिकचा पदभार काढून घेण्यात आला होता.

प्रभारी पदभार हा समकक्ष अधिकाऱ्यांकडे देणे शासन आदेशाप्रमाणे अभिप्रेत असताना, तो पदभार हा माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरेंकडे सोपविला. श्री. देवरे यांनी गत आठवड्यात पदभार स्वीकारला. दुसरीकडे, संस्थेच्या विश्वस्त मंडळासह शिक्षणाधिकारी पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेत गत आठवड्यात जामीन घेतला.

यातच पाटील यांची वैद्यकीय रजा संपल्याने सोमवारी ते जिल्हा परिषदेत हजर झाले. श्री. पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांची भेट घेतली.

Nashik ZP News
Diwali 2023: नाशिकमध्ये यंदा तिप्पट प्रदूषण! वायू-ध्वनिप्रदूषणाने गाठला उच्चांक, फटाक्यांचे प्रमाण जास्त

यात परदेशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी १५ नोव्हेंबरपर्यंत रजेवर असल्याचे सांगितले. वैद्यकीय रजेवर असताना शासन आदेशाप्रमाणे आपला पदभार काढण्यात आलेला आहे.

त्यामुळे आपण हजर होऊ शकतात; परंतु माध्यमिकचा पदभाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाटील यांच्या पदभाराबाबतचा गुरुवारी श्रीमती मित्तल नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वैद्यकीय रजा संपल्याने हजर झालो आहे. गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

"माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांची वैद्यकीय रजा संपल्याने ते सोमवारी हजर झाले. त्यांचा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासन आदेशाप्रमाणे काढलेला आहे. त्यामुळे पदभाराबाबत गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी योग्य तो निर्णय घेतील." - रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Nashik ZP News
Crop Insurance Scheme : अग्रिमची साडेतीन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दिवाळीत रकमेचे शासनाचे आश्वासन हवेतच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.