Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगगडावर भाविकांसाठी ड्रेस कोड? लवकरच निर्णय होण्याचे सूतोवाच

Saptashrungi Devi Temple
Saptashrungi Devi Templeesakal
Updated on

Nashik News : नागपूर, पुणे येथील काही मंदिरांत भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय मंदिर फेडरेशन, ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर सप्तशृंग मातेच्या मंदिरातही पावित्र्यता जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा, अशी भाविकांमध्ये चर्चा असून, त्यासाठी विश्वस्त मंडळातील सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत व ग्रामस्थ सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेण्याचे सूतोवाच सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार, विश्वस्त अॅड. ललीत निकम व ग्रामस्थांनी केले आहे. (Decision on dress code for devotees at Saptshringigarh soon nashik news)

पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेले काही भाविक येतांना तोडके कपडे घालून येतात. त्यामुळे अशा भक्तांना आळा घालण्यासाठी नागपूर येथील तीस मंदिरे तर पुण्यातही काही मंदिरांच्या विश्वस्तांनी असे कपडे परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोडही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी नियमावली तयार केली होती. ड्रेस कोड लागू केला होता. परंतु त्यानंतर मंदिर संस्थानने यू टर्न घेत काही तासांत निर्णय फिरवला होता.

असे असले तरी सप्तशृंगगडावर भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ भाविक सकारात्मक आहेत. गडावर राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्ण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Saptashrungi Devi Temple
Saptashrungi Devi : सप्तशृंग गडावर भाविकांची रीघ; 30 हजारावर भाविकांनी घेतले दर्शन

"महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मी सकारात्मक असून, श्री सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी किंवा कसे, याबाबत अभ्यास करून अध्यक्ष, विश्वस्त मंडळाशी चर्चा करून निर्णय घेऊ."- अॅड. ललीत निकम, विश्वस्त, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट

"मंदिरात आपण दर्शनासाठी जातो, त्यामुळे तेथील पावित्र्य राखले गेले पाहिजे. गडावरही अशोभनीय व तोकडे कपडे घालून भाविक येत असल्याने मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली पाहिजे, अशी ग्रामपंचायतीची भूमिका असून, त्यासाठी लवकरच निर्णय घेऊ."- रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगगड

"महाराष्ट्रातील मंदिर संघाने वस्त्रसंहिताबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. तोकडे कपडे घालून मंदिरात जाणाऱ्यावर चाप बसणे आवश्यक आहे. श्री भगवतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वस्त्रसंहिता लागू केली, तर स्वागतच करू." -शांताराम सदगीर, धनेश गायकवाड, ग्रामस्थ, सप्तशृंगगड

Saptashrungi Devi Temple
Water Scarcity : मनमाड शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट; विकत पाणी घेण्याची वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()