Nashik News : गरज भागविण्यासाठी प्रशिक्षणार्थी फायरमन; अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाचा तुटवडा

fire brigade
fire brigadesakal media
Updated on

Nashik News : शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या वर पोचत असताना अवघे २८ फायरमन कार्यरत असून, २७१ फायरमनचे पदे रिक्त आहे. रिक्त पदांची भरती होत नाही. त्यामुळे ४५ प्रशिक्षणार्थी फायरमन भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महासभेवर तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

शहराचा विस्तार व विस्ताराबरोबरच लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रातदेखील वाढत होत आहे. त्याअनुषंगाने अग्निशमन दलाचे काम वाढले आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलास आजमितीस अंदाजे २५ लाख लोकसंख्या असलेल्या नागरिकांना आग, अपघातप्रसंगी व बचाव कार्य करण्यासाठी त्वरित घटनास्थळी कमी वेळेत पोचणे बंधनकारक आहे. (Decision to fill 45 Apprentice Fireman nashik news)

तातडीने मदतकार्य करावे लागते. दिवाळीमध्ये फटाके स्टॉल्स, नवरात्रामध्ये सप्तशृंगी गड, कालिका देवी मंदिर, प्रदर्शन, व्हीआयपी दौरे, गणपती विसर्जन याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन विभागाकडील बंब व स्टाफ स्टॅन्डबाय ठेवावा लागतो. अग्निशमन दलाकडे आजमितीस मनुष्यबळाचा खुपच तुटवडा आहे.

१९९४ नंतर या विभागाकडे मोठी भरती झाली नाही. त्यातच बरेचसे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून १२-१२ तास ड्यूटी करून घ्यावी लागते. अनेक कर्मचाऱ्यांचे वय आजमितीस ५० ते ५५ वर्षाच्या पुढे आहे व काही जण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने कामकाजामध्ये फार मोठया अडचणी निर्माण होतात.

अग्निशमन विभागामध्ये फायरमनची एकूण २९९ मंजूर पदे असून, त्यापैकी फक्त २८ फायरमन कार्यरत आहेत. २७१ फायरमनची पदे रिक्त असल्याने तसेच अग्निशमन सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांना सेवा देणे गरजेचे आहे. त्यामुळे ९० प्रशिक्षणार्थी फायरमन मानधनावर भरती करण्यात आयोगाने मान्यता दिली आहे.

fire brigade
Nashik News : जलशुद्धीकरण केंद्रात अज्ञात पाइपलाइन; जलजीवन मिशन उपक्रमात अनियमितताचा संशय

त्यानुसार अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या अग्निशमन सेवा संचालकांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याप्रमाणे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थी फायरमनची यादी प्राप्त झाली आहे.

परंतु अग्निशमन सेवा संचालकांची प्रशिक्षणार्थी फायरमन यादी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा फायरमनचा कोर्स पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थी फायरमन यांना अग्निशमन विभागात शिकावू उमेदवार म्हणून रुजू करून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

स्वतःच्या जखमेवर करावे लागणार काम

अग्निशमन दलात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना जखमीचे काम स्वतःच्या जबाबदारीवर करावे लागणार आहेत. तसे हमीपत्र प्रशिक्षणार्थी उमेदवारांना भरून द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे आठ तासांची सेवा बंधनकारक, पीपीए कीट बंधनकारक, स्वखर्चाने अग्निशमन दलाचा गणवेश शिवून घ्यावा लागणार आहे. महापालिकेमार्फत सात लाख रुपयांचा विमा उतरविला जाणार आहे.

fire brigade
Nashik Onion News : कांदा भावात सर्वदूर घसरण न झाल्याने निर्यातबंदीची पिकवलेली अफवा ‘फेल’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.