नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महापालिकेत माजी सत्ताधारी झालेल्या भाजपने पुन्हा आयटी पार्कच्या मुद्द्याला हवा दिली असून, त्या संदर्भात झालेल्या बैठकीत आयटी पार्कसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर लॉजिस्टिक पार्कसाठी नव्याने पर्याय शोधला जाणार आहे. (Decision to implement new process for IT Park Nashik News)
मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेत भाजपची सत्ता असताना शेवटच्या वर्षात माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका हद्दीत आयटी पार्क व लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता. आयटी पार्कसाठी आडगाव शिवाराची निवड करण्यात आली. या जागेवर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट या तत्त्वावर जागा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दहा जागामालकांनी तयारी दाखवली.
देशभरातील आयटी उद्योगांना निमंत्रित करण्यासाठी एका हॉटेलमध्ये केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत विप्रो, टीसीएस, क्रेडिट सीस, केपीआयटी आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून आयटी उद्योग उभारण्याची तयारी दर्शविली. आयटी पार्कला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात ठाणे येथील एका कंपनीने एक रुपया मानधनावर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी दर्शवली.
करार करण्यासाठी महापालिकेने वकिलांचा अभिप्राय मागविला, मात्र अद्यापपर्यंत अभिप्राय आला नाही. दरम्यानच्या काळात राज्य शासनानेदेखील दखल घेतली नाही. परिणामी आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पूर्व विभागात आयटी पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, यासंदर्भात आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी आयुक्तांकडे या विषयावर बैठक घेण्याची मागणी केली होती. बैठकीनुसार नवीन प्रकल्प राबविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
लॉजिस्टिक पार्कला ही पर्याय
केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी १००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आडगाव शिवारातच जागेचा शोध घेण्यात आला. मात्र, ही प्रक्रियादेखील रेंगाळल्याने आता नव्याने लॉजिस्टिक पार्कसाठी जागा शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जागा घेताना ट्रक टर्मिनस पर्याय राहणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.