NMC News : पुणे शहरात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पाच जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात होर्डिंग्जची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्थिरता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Decision to inspect advertisement hoardings in city insturctions for submission stability certificate NMC News nashik)
पुणे शहरातील किवळे उड्डाणपुलाजवळ अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन गंभीर जखमी झाले. सदर दुर्घटनेमुळे नाशिक महापालिका हद्दीतील होर्डिंगदेखील चर्चेत आले.
शहरात होर्डिंगची संख्या मर्यादित असली तरी सध्या वादळी वारे व पावसाचा जोर असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर होर्डिंग धारकांना दरवर्षी स्थिरता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) महापालिकेच्या विविध कर विभागाला सादर करावी लागते.
मात्र, बहुतांश होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र पालिका प्रशासनाला प्राप्त होत नाही व कर्मचारीदेखील स्थिरता प्रमाणपत्राची मागणी करत नाही. त्यामुळे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीने स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना होर्डिंग्ज धारकांना देण्यात आल्या आहेत.
शहरात जवळपास ३५० हून अधिक छोटे- मोठे होर्डिंग आहे. तर जवळपास बारा हजार पोलवर छोटी जाहिरात होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. सध्या शहरात इलेक्ट्रॉनिक्स होर्डिंगदेखील उभारले जात आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
त्यामुळे महापालिकेची परवानगी घेताना स्थिरता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र महापालिकेची परवानगी मिळाल्यानंतर शक्यतो होर्डिंगची मजबुती तपासली जात नाही. कर्मचारी वर्गदेखील काणाडोळा करतात.
साधारण तीन वर्षांपूर्वी शहरात गंगापूर नाक्यावर होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली होती. त्यानंतर स्थिरता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले. त्याची नियमित तपासणी होत नव्हती. मात्र आता पुणे शहरातील दुर्घटनेनंतर तातडीने स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
"पुणे शहरातील दुर्घटनेचे निमित्त असले तरी होर्डिंग धारकांना स्थिरता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तातडीने स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
- अर्चना तांबे, उपायुक्त, विविध कर विभाग, महापालिका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.