Citylinc Bus Service: ‘सिटीलिंक’कडून पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय; तोटा भरण्यासाठी उपाययोजना

nashik city bus service
nashik city bus serviceSakal
Updated on

Citylinc Bus Service : महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या सिटीलिंक बससेवेचा तोटा ८६ कोटींच्या वर पोचल्याने उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाच्या धर्तीवर पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर तिकिटांवर जाहिरात प्रसिद्ध करणे व अधिकच्या बोजावर दर आकारून तोटा भरून काढला जाणार आहे. (Decision to start parcel service from Citylinc Measures to cover losses nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट करण्यासाठी महापालिकेकडून नाशिक महानगर परिवहन महामंडळाची (सिटीलिंक) स्थापना करण्यात आली. सिटीलिंकच्या मार्फत जुलै २०२१ पासून शहरात अडीचशे बस सुरू करण्यात आल्या.

यात दोनशे बस सीएनजी, तर पन्नास डिझेल इंधनावर चालणाऱ्या बसचा समावेश आहे. सिटीलिंक नाशिककरांसाठी महत्त्वाची असली तरी महापालिकेच्या दृष्टीने पांढरा हत्ती पोसण्यासारखा आहे.

सिटीलिंक सेवेचा दोन वर्षात ८६ कोटींच्या वर तोटा पोचला आहे. ऑपरेटर कंपन्यांना प्रतिकिलोमीटर ८५ रुपये अदा केले जातात. तिकीट विक्रीतून अवघे ४५ रुपये प्रतिकिलोमीटर महसूल मिळतो.

एका तिकिटामागे सरासरी ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोमीटर तोटा सहन करावा लागतो. २०२१ व २२ या आर्थिक वर्षात सिटीलिंक कंपनीला २० कोटी २१ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तर २०२२ व २३ या आर्थिक वर्षात ६६ कोटी रुपयांचा तोटा आहे.

२०२३ व २४ मध्ये तोटा शंभर कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोटा घटविण्यासाठी सिटीलिंक कंपनीचे नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.

nashik city bus service
NMC News: ‘मनपाचा गोदाकिनारी स्वच्छोत्सव’! ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या अनुषंगाने गोदाघाटावर विशेष स्वच्छता मोहीम

त्यामध्ये महापालिका हद्दीपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, भगूर, देवळाली कॅम्प, इगतपुरी, घोटी इथपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे.

आता याच भागातून पार्सल सेवादेखील सुरू केली जाणार आहे. पार्सल सेवेचे दर अद्याप निश्चित नसले तरी या माध्यमातून अधिक-अधिक उत्पन्न मिळवून तोटा कमी करण्याचे प्रयत्न आहे.

वीस किलोवर बोजा

एसटी महामंडळाकडून वीस किलोपेक्षा अधिक बोजा सोबत असेल तर त्यासाठी स्वतंत्र दर आकारला जातो. सिटीलिंक कंपनीच्या सेवेत मात्र सध्या कुठल्याही प्रकारचा दर नाही.

यापुढे आता वीस किलोपेक्षा अधिक सामान बरोबर असेल तर प्रवाशांना त्याचे तिकिटाच्या रूपाने दर अदा करावे लागणार आहे.

nashik city bus service
Festival Unity: कलेच्या माध्यमातून सलोखा जपण्याचा प्रयत्न! मुस्लिम तरुणाकडून बाप्पाच्या मूर्तीला फेट्याचा साज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.