Deepak Kesarkar: शासकीय शाळांमध्ये बालवाडीपासून शिक्षण : दीपक केसरकर

स्‍वयंअर्थसहाय्य शाळांना तूर्त मंजुरी नाही
Education Minister Deepak Kesarkar speaking at a press conference on Sunday
Education Minister Deepak Kesarkar speaking at a press conference on Sundayesakal
Updated on

Deepak Kesarkar : यापूर्वी स्‍वयंअर्थसहाय्य तत्त्वावरील शाळांना मंजुरीसाठी वर्षभराहून अधिक कालावधी लागत होता. परंतु, आमच्‍या कार्यकाळात अवघ्या तीन-चार महिन्‍यांत मंजुरी मिळते आहे.

मात्र, विद्यार्थी कमी आणि शाळा जास्‍त असे झाल्‍यास वेगळ्या स्‍वरूपाचे प्रश्‍न उद्‍भवतील. त्‍यामुळे तूर्त नवीन स्‍वयंअर्थसहाय्यित शाळांना मंजुरी दिली जाणार नाही.

खासगी शाळांच्‍या धर्तीवर शासकीय शाळांमध्येही बालवाडी (केजी)पासून शिक्षण उपलब्‍ध केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. (Deepak Kesarkar statement Education from Kindergarten in Government Schools nashik news )

शिक्षण विभागाच्‍या आढावा बैठकीसाठी नाशिकला आलेल्‍या श्री. केसरकर यांनी बैठकीपूर्वी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी श्री. केसरकर म्‍हणाले, की स्‍वयंअर्थसहाय्यित शाळांवर कमीत कमी निर्बंध असे धोरण होते.

परंतु. इंग्रजी माध्यम शाळांच्‍या वाढत्‍या तक्रारी पाहता संस्‍थाचालक, पालक प्रतिनिधी यांची समिती स्‍थापन करणार असल्‍याचे त्‍यांनी जाहीर केले.

शिक्षक भरती सुरू, अन्‍य पदांवरही भरती

शिक्षक भरतीसंदर्भात ५ जुलैला बंदी उठविल्‍यावर प्रक्रिया राबविली जाते आहे. पहिल्‍या टप्प्‍यात ३० हजार आणि दुसऱ्या टप्प्‍यात २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल. अनुदानित शाळांनी त्‍यांचे रोस्‍टर पूर्ण करून घेतल्‍यास भरती प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत.

नव्‍याने शिक्षक दाखल होतील, हे गृहीत धरून बदल्‍या केलेल्‍या असून, विलंब झाल्‍यास विद्यार्थ्यांचे संभाव्‍य नुकसान होऊ शकते. केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी पदांच्‍या रिक्‍त जागांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविली जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Education Minister Deepak Kesarkar speaking at a press conference on Sunday
Deepak Kesarkar : B.Ed., D.Ed धारकांसाठी आनंदाची बातमी! शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

त्‍या अधिकाऱ्यांना ‘साईड पो‍स्टिंग’

शिक्षण विभागातील वाढत्‍या भ्रष्टाचाराच्‍या प्रश्‍नावर श्री. केसरकर म्‍हणाले, की बऱ्याच वेळा मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्‍या नावाने पैशांची मागणी केली जाते. परंतु, आमच्‍यापैकी कुणीही अशा स्‍वरूपात पैशांची मागणी करीत नाही, हे अनेक बैठकांमध्ये स्‍पष्ट केले आहे.

भ्रष्टाचाराच्‍या तक्रारी असलेल्‍या अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या केल्या असून, त्‍यांना ‘साइड पोस्टिंग’ दिलेली आहे. तक्रार आल्‍यास आधी निलंबन करीत तातडीने चौकशी केली जात असून, भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले.

मंत्री केसरकर म्‍हणाले...

- विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्‍यात हेच आमचे ध्येय

- पीजीआय इंडेक्‍ससंदर्भात विरोधकांकडून अपप्रचार सुरू

- निकष बदलल्‍याने इंडेक्‍समधील क्रमवारीत बदल

- शाळांमध्ये स्‍काउट-गाईड, खरी कमाई सर्वांना सक्‍तीचे

- शिक्षण क्षती टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर

- रीड महाराष्ट्र, रीड मुंबईसारख्या उपक्रमांतून वाचनास चालना

Education Minister Deepak Kesarkar speaking at a press conference on Sunday
Deepak Kesarkar: मी शिर्डीत प्रार्थना केली अन्‌ कोल्‍हापूरची पूरस्थिती टळली! केसरकर यांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.