Deepak Kesarkar | हिंदुत्व सोडणाऱ्यांमध्ये राम नाही : केसरकर

Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal
Updated on

नाशिक : राज्यात काही घडलं तरी भारतीय जनता पक्षाला कचाट्यात उभा करायचे असा प्रयोग विरोधकाकडून सुरू असल्याची टीका करताना सरकार कुठल्याही परिस्थितीत जातीय दंगली होऊ देणार नाही असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. श्रीराम हे हिंदुत्वाचे प्रतीक असून त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांच्यासोबत राम राहूच शकत नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (Deepak Kesarkar statement Ram not among those who left Hindutva nashik political news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Deepak Kesarkar
Jitendra Awhad: 'छत्रपतींमुळे मंदिरं राहिली त्यांनाच…'; संयोगीताराजेंना 'वेदोक्त'वरून झालेल्या विरोधानंतर आव्हाड संतापले!

श्रीराम नवमीनिमित्त केसरकर यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्याचबरोबर त्यांनी हिंदुत्व देखील सोडले. काँग्रेसच्या मतांसाठी किती लाचार आहे हे मालेगाव मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेने दिसून आले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला तर आम्ही तुमच्या सोबतच राहणार नाही असा इशारा देता आला असता, परंतु आता तेवढी हिंमत राहिलेली नाही. विरोधी पक्ष नेते अजित पवार व जयंत पाटील हे लवकर उठणारे नेते आहेत, त्यांना देखील राज्यात सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल असे स्वप्न पडायला लागले आहेत असा टोला त्यांनी लगावला.

Deepak Kesarkar
Sanyogeetaraje Chhatrapati: वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांचा विरोध; छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संतापल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.