नाशिक : दीपक पांडेंचा भोंग्यांचा ‘तो’ आदेश पोलीस आयुक्तांकडून रद्द

दीपक पांडेंचा भोंग्यांसंदर्भातला आदेश पोलीस आयुक्तांनी रद्द केला आहे.
Nashik Police Commissioner
Nashik Police Commissioneresakal
Updated on

नाशिक : धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी १७ एप्रिल रोजी काढलेला आदेश पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द करत सर्वोच्च न्यायालय आणि शासनाने घालून दिलेल्या आदेशाचे शहरात देखील पालन केले जाईल असेही आयुक्त नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.

...असा होता आदेश

राज्यात ३ मे पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालक करत मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अन्यथा नंतर मशिंदींसमोर भोंगे लावत दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालिसेचे पठण केले जाईल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर राज्यात भोंग्यांवरून चांगलेच राजकारण पेटले आहे. याच दरम्यान नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी एक आदेश काढत शहर पोलीस आयुक्त हद्दीत असलेल्या सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी ३ मे पूर्वी लेखी अर्ज करत रितसर पोलीसांची परवानगी घ्यावी, त्यानंतर सर्व परवानगी नसलेले भोंगे उतरविण्यात येतील. मशिदींच्या १०० मीटरच्या परिसरात अजानच्यावेळी १५ मिनिटे पूर्वी, किंवा १५ मिनिटे नंतर कुठल्याही प्रकारचे भजन, गाणे, भक्तीगिते लावण्यात येवू नये, या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई तसेच विनापरवानगी भोंगे वाजविल्यास ४ महिने कारावास किंवा तडीपारीची कारवाई केली जाईल असे आदेश दिले होते.
या आदेशाचे पालन करण्याच्या उद्देशाने भोंगे परवानगीबाबत धार्मिक स्थळांकडून परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्याची तयारी देखील करण्यात येवू लागली होती.

Nashik Police Commissioner
स्‍वच्‍छ, सुंदर अन् स्‍वस्थ 'नाशिक' निर्माण करू : आयुक्त

सहाच दिवसात आदेश रद्द

पोलीस आयुक्त पांडे यांनी भोंग्यांसंदर्भात आदेश काढल्यानंतर चार दिवसांनी त्यांची मुंबईला बदली झाली. त्यांच्या ऐवजी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. श्री. नाईननवरे यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार हाती घेताच सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, शासन परिपत्रक, पोलीस आयुक्त हद्दीचा घेतलेला आढावा सद्यपरिस्थिती, प्रचलित शासन धोरण विचारत घेत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत स्वतंत्र आदेशाची आवश्‍यकता नसल्याने दीपक पांडे यांनी भोंग्यांबाबत काढलेला तो आदेश अवघ्या सहा दिवसांमध्ये रद्द केला.

Nashik Police Commissioner
नाशिक जिल्ह्यात 3 वर्षांत 3848 अपघात; अडीच हजार नागरिकांनी गमावले प्राण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.