Deepika Chavan : बागलाण तालुक्यात आरोग्यसेवेचे तीनतेरा : दीपिका चव्हाण

Deepika Chavan
Deepika Chavanesakal
Updated on

Deepika Chavan : बागलाण तालुक्यात आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले असून, शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय झाली आहे.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाढलेली अरेरावी, याला आमदारांचे अक्षम्य दुर्लक्ष व प्रशासनाची बेपर्वाई कारणीभूत असल्याची घणाघाती टीका बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी केली. (deepika chavan statement condition of health care in Baglan taluka nashik crime)

याबाबत चव्हाण म्हणाल्या, की तालुक्यातील आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह सर्वसामान्य रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून, तालुक्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. आदिवासी बांधवांना पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नसल्याने गरोदर मातांवर योग्य उपचार होत नाहीत.

त्यामुळे मातामृत्यू, कुपोषित बालकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना बागलाण तालुक्यात आरोग्य विभागासाठी येणारा निधी नेमका जातो कुठे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

कपालेश्वर (ता. बागलाण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गरोदर आदिवासी महिलेवर उपचार न करता तिला डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. केंद्रात ड्यूटीवर असलेल्या मद्यधुंद वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला नाइलाजास्तव डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जावे लागले.

या घटनेमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मात्र याकडे लक्ष द्यायला आमदारांकडे वेळ नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तालुक्यातील मुल्हेर येथील ग्रामीण रुग्णालयासाठी भरीव निधीची तरतूद करून घेतली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Deepika Chavan
Deepika Chavan : आमदार दिलीप बोरसेंकडून बागलाणवासियांची दिशाभूल : दीपिका चव्हाण

मात्र अजूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. शहरालगत भाक्षी शिवारात उपजिल्हा रुग्णालयासाठी इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली. त्याचबरोबर सटाणा, डांगसौंदाणे व नामपूर ग्रामीण रुग्णालयांसह ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.

"आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाचे काम मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे. बागलाण तालुक्यातील आरोग्य सुविधांचे प्रलंबित प्रश्न, आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे."- दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण

"केंद्रात व राज्यात आमचे भाजपचेच सरकार असल्याने सततच्या पाठपुराव्यामुळे मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाचे काम मार्गी लागले असून, सुरू होईल. आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

असे सर्वच प्रश्न मार्गी लागणार असल्याच्या भीतीपोटी माजी आमदार दीपिका चव्हाण यांची तगमग चालली आहे. त्यांची कर्तव्यशून्य कामगिरी आहे. नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहून ती लपविण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो. आगामी निवडणुकीत ‘दूध का दूध, पानी का पानी’ सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही." - दिलीप बोरसे, आमदार

Deepika Chavan
Dipika Chavan News: कांद्याला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्या : दिपिका चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.