Ram Lalla Pran Pratishtha : आज अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिर मुर्ती प्रतिष्ठापना उत्सवानिमित्त मनमाड शहरात सकल हिंदू समाजातर्फे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील सर्व राजकीय पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व समाजबांधव सहभागी झाले होते. (Deepotsav Shobhayatra Ramnama overwhelmed Manmadkar nashik news)
अयोध्येतील प्रभू रामलल्ला मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा मनमाड शहरात विविध कार्यक्रमांनी अभूतपूर्व उत्साहात, जल्लोषात आणि भक्ती भावाने साजरा करण्यात आला. संपूर्ण शहर अक्षरशः रामनामाने भारावून गेले.
रामाची भव्य शोभायात्रा, श्री रामाची पालखी, सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण,गीत रामायण, हनुमान चालिसा पठण, श्री रामाची महाआरती,लाडू, महाप्रसाद, दूध वाटप अशा विविध कार्यक्रमासह फटाक्यांच्या आतषबाजीने मनमाड शहर अक्षरशः दणाणून गेले.
श्री राम मंदिरासह शहरातील सर्वच मंदिरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी देखील स्वच्छता, सडा मारुन रांगोळ्या, पणत्या, आकाश कंदील, विद्युत रोषणाई, रामाची प्रतिमा असलेले ध्वज, पताका राम नामाचा जयघोष, व नैवेद्य अशा अभूतपूर्व उत्साहात मनमाड करांनी सोमवारी अक्षरशः दिवाळी साजरी केली.
शहरातील सर्वात मंदिरांमध्ये स्वच्छता करून आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली मोठ्या पडद्यावर सामूहिक स्वरूपात या सोहळ्याचा थेट प्रक्षेपणाचा आनंद भक्तांनी घेतला.
राम मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. भजनी मंडळातर्फे भजन, महाप्रसाद वाटप झाले. श्री राम मंदिर येथून श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भाविक आणि रामभक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
सकल हिंदू समाज, रुद्र हनुमान मित्र मंडळ, सारथी मित्र मंडळ, जीएलएसग्रुप श्रीराम मंदिर, पंकज खताळ फाउंडेशन नवयुग गणेश मंडळ, जय माताजी मित्र मंडळ, साई राजे ग्रुप व रामभक्तांनी या विविध कार्यक्रमाचे संयोजन केले.
दत्त मंदिर रोडवरील श्री रुद्र हनुमान मंदिरात श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य महाआरती आणि दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन, श्री रामाच्या मूर्तीचे पूजन झाले. भाविकांना सुमारे दहा हजार बुंदीच्या लाडूचे वाटप करण्यात आले सायंकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
व्यापारी महासंघातर्फे श्रीरामांच्या मूर्तीची महाआरती करण्यात आली. नारळाच्या प्रतीकृतीतून भव्य रामनाम साकारण्यात आले होती. गुरुद्वारामध्ये देखील रामोत्सव साजरा करण्यात येऊन भाविकांना महाप्रसाद आणि दूध वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात गीत रामायणाचा भव्य कार्यक्रम झाला.
यानिमित्त मोटरसायकल रॅली व शोभायात्रा देखील काढण्यात आली. यावेळी ठीकठिकाणी भगवे ध्वज लावून एकात्मता चौकात राममूर्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. सायंकाळी महाआरतीचा, लेझर शो, लाडू वाटप कार्यक्रम आणि राम जयघोषाने परिसर दणाणून गेला.
कारसेवकांचा सत्कार
सारथी मित्र मंडळातर्फे नेहरू गार्डनमध्ये प्रभू रामांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली. तसेच बाबरी मशीद पाडण्याच्या लढ्यात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.