दुचाक्या चोरणाऱ्या दिल्लीतील सराईताला अटक; 6 दुचाक्या हस्तगत

Suspects of stealing two-wheelers from the city area and confiscated two-wheelers.
Suspects of stealing two-wheelers from the city area and confiscated two-wheelers. esakal
Updated on

नाशिक : शहरासह ग्रामीण परिसरातून दुचाक्या चोरी करणाऱ्या दिल्लीतील सराईत चोरट्याला मुंबई नाका पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून शहरातून चोरलेल्या पाच तर कळवण येथून चोरलेली एक अशा सहा चोरीच्या दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. (Delhi innkeeper arrested for stealing two wheelers 6 bikes seized Nashik Latest Marathi News)

Suspects of stealing two-wheelers from the city area and confiscated two-wheelers.
Leopard Attack : सोनजांब येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

अब्दुल जमीर रौफ अन्सारी (२७, रा. प्रेमनगर गल्ली नं. २, सेंट्रल दिल्ली, हल्ली रा. बजरंगवाडी, नाशिक) असे या दुचाक्या चोरट्याचे नाव आहे. मुंबई नाका पोलिसांनी संशयित अब्दुल यास बजरंगवाडीतून पकडले. त्याची चौकशी सुरु असताना त्याने दोन ते अडीच लाख रुपयांच्या सहा दुचाक्यांची चोरी केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी कारवाईत प्लॅटीना (एमएच १५ एचबी ४७५६), पॅशन प्लस (एमएच १५ सीजे ७४००), (एमएच १५ एचएल १४७८), अॅक्टीवा (एमएच १५ एचपी ३४०५), अॅक्टीवा (एमएच १५ डीझेड ५३३०) व करिझ्मा (एमएच १५ डीएक्स ८९८०) या क्रमांकाची सहा दुचाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक सुनिल रोहोकले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत अहिरे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक के. टी. रोंदळे, हवालदार रोहीदास सोनार, शिपाई आप्पा पानवळ, शिपाई समीर शेख व विश्वास साळुंखे यांनी केली आहे.

Suspects of stealing two-wheelers from the city area and confiscated two-wheelers.
Nashik : खचलेल्या रस्त्याची NMC आयुक्तांकडून पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.