नाशिक : दोन रुग्‍णांच्‍या नमुन्‍यात डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिएंट

delta variant
delta variantesakal
Updated on

नाशिक : सध्या जागतिक स्‍तरावर डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिएंट (delta plus variant) धुमाकूळ घालत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची (coronavirus) लागण झालेल्‍या बाधितांपैकी काहींचे नमुने उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. एप्रिल महिन्‍यात आढळलेल्‍या जिल्‍ह्यातील दोघा बाधितांच्‍या नमुन्‍यात डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिएंट आढळला आहे. जिल्‍ह्यात दोन रुग्‍णांच्‍या नमुन्‍यात डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिएंट आढळल्‍याने आरोग्‍य यंत्रणा (medical department) सतर्क झाली आहे.

वैद्यकीय तपासणीचे काम आरोग्‍य यंत्रणेच्या हाती

हे बाधित एप्रिलमध्ये आढळले होते व सध्या कोरोनामुक्‍त झाले आहेत. असे असले तरी संभाव्‍य धोका टाळण्यासाठी दोघा रुग्‍णांशी संपर्क साधत वैद्यकीय तपासणीचे काम आरोग्‍य यंत्रणेने हाती घेतले आहे. एक रुग्‍ण ठाणगाव (ता. सिन्नर), तर अन्‍य एक रुग्‍ण नाशिकच्‍या तिडके कॉलनीतील आहे. दोघांपैकी एक महिला रुग्‍ण असून, अन्‍य एक ७१ वर्षीय पुरुष आहे. दोघांनी कोरोनावर मात केली असली, तरी संभाव्‍य धोका टाळण्यासाठी त्‍यांची माहिती मागविली आहे. त्‍यांची वैद्यकीय तपासणी करून त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींची नमुन्‍यांचीही तपासणी केली जाणार असल्‍याचे समजते.

delta variant
शिक्षणाधिकारी लाच प्रकरण : डॉ. वीर- झनकरना अखेर जामीन मंजूर

३ ते २८ एप्रिलदरम्‍यान दोघा बाधितांच्‍या नमुन्‍यांत डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिएंट आढळला आहे. यापैकी एका रुग्‍णाशी संपर्क झाला असून, त्‍याने गृहविलगीकरणात कोरोनावर मात केली आहे. अन्‍य एकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. -सूरज मांढरे, जिल्‍हाधिकारी

एप्रिलमधील दोन कोरोनाबाधितांच्‍या नमुन्‍यात डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिएंट आढळला आहे. हे रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. दोघांच्‍या सखोल वैद्यकीय तपासणीसह अन्‍य आवश्‍यक उपाययोजना करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. - डॉ. अशोक थोरात, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक

delta variant
महिला तलाठी विनयभंग प्रकरण : तात्पुरत्या बदलीला स्थगिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.