सिडको (जि. नाशिक) : सिडकोमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन विना (without Prescription) औषधे आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कुत्ता गोळी (Kutta Goli) विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स (Medical Stores) वर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे (Assistant Commissioner of Food and Drug Administration) निवेदनाद्वारे करण्यात आली. (Demand for action against doctors Medical stores selling kutta goli by NCP Nashik News)
सिडको परिसरातील मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे आणि अनधिकृतरीत्या नशा करण्याच्या कुत्ता गोळ्या विकल्या जातात, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अंकुश वराडे यांच्या निदर्शनात आली. या पार्श्वभूमीवर त्यांनी शहर सरचिटणीस आणि सिडकोचे रहिवासी मुकेश शेवाळे यांच्याशी चर्चा करत सिडको कार्याध्यक्ष राहुल कमानकर आणि सहकाऱ्यांसोबत सहायुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या मेडिकल स्टोअर्स वर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कुप्रसिद्ध असलेल्या कुत्ता गोळीदेखील सर्रासपणे विकल्या जात असल्याचेदेखील अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून देण्यात आले. या वेळी कृष्णा काळे, संतोष भुजबळ, हरीश महाजन, सुनील घुगे, अक्षय परदेशी, हर्षल चव्हाण, नितीन अमृतकर, विक्रांत डहाळे, अक्षय पाटील, सुबोध नागपुरे आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.