नाशिक रोड : नाशिककरांची प्रवासवाहिनी असणारी पंचवटी एक्स्प्रेस सध्या समस्येच्या गर्तेत सापडली आहे. पंचवटी एक्स्प्रेसमध्ये रोज कचरा, घाण असते.
बाहेरून पंचवटी धुतली जात नाही म्हणून चाकरमान्यांनी संताप व्यक्त केला आहे. रोज नाकाला रुमाल लावून पंचवटीने प्रवास करावा लागत असल्याची गोष्ट प्रवाशांनी बोलून दाखवली. (Demand for cleanliness of Panchvati Express Nashik News)
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये सध्या घाण, कचरा, झुरळ, डास यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय बाहेरच्या बाजूने पंचवटी एक्स्प्रेस धुतली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून, अशा प्रकारचे फोटो प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. मनमाडपासून पंचवटी रोज सीएसटीला जाते.
या गाडीत किमान दीड हजार प्रवासी प्रवास करतात. या पंचवटीमध्ये महिला, नोकरदार, चाकरमानी, व्यावसायिक, विद्यार्थी, बाहेरगावावरून आलेले प्रवासी प्रवास करतात. मात्र, सध्या पंचवटी एक्स्प्रेस साफ होत नाही. रोज घाण, कचरा, खाद्यपदार्थ पंचवटीमधील डस्टबिनमध्ये तसेच राहतात. पर्यायाने दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
अनेक प्रवासी पान, गुटखा खाऊन गाडीच्या बाहेर थुंकतात. ही थुंकी पुन्हा पंचवटी एक्स्प्रेसच्या बाहेरील भागावर पडते. पर्यायाने सर्व पंचवटी घाण होते. शिवाय जनशताब्दी आणि पंचवटीचा रेक शेअर केल्यामुळे ही दयनीय अवस्था झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.
"रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये स्वच्छतेवर आवाज उठवला होता, मात्र सुधारणा झाली नाही. रोज नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागतो. जनशताब्दीचा रॅक आणि पंचवटीचा रॅक शेअर केल्यामुळे ही दयनीय अवस्था झाली आहे. रेल्वेने शाश्वत उपाययोजना करायला हवी. प्रवाशांच्या आरोग्याला या अस्वच्छतेचा मोठा धोका आहे."
- किरण बोरसे, प्रवासी व विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.