Nashik : वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ उभारण्याची मागणी

car parking
car parkingesakal
Updated on

नाशिक : रविवार कारंजा भागातील वाहतूक कोंडी तसेच वाहने पार्किंगची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी येथील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग करावी या संदर्भात महापालिका तसेच स्मार्टसिटी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रकल्प पूर्णत्वास जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेत वाहनतळ उभारण्याची मागणी केली. (Demand for construction of parking lot to solve traffic problem Nashik Latest Marathi News)

car parking
Increased Encroachment in City : वाढतं अतिक्रमण वाहतूक कोंडीचं कारण ठरतंय!

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, आहे की शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजाच्या मेनरोड, सराफ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्याचप्रमाणे या भागात मोठ्या प्रमाणात वाहने लावण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जुन्या यशवंत मंडईची इमारत पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी बहुमजली वाहन उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या संदर्भात महापालिकेत ठरावदेखील करण्यात आला, मात्र बहुमजली वाहनतळाचे काम रखडल्याने रविवार कारंजा, मेनरोड व सराफ बाजार या भागातील व्यवसायिकांची अनेक वर्षांची मागणी प्रलंबित आहे.

वाहनांसाठी पार्किंगची सुविधा नसल्याने स्मार्ट रोडच्या सुंदरीकरणाला गालबोट लागले आहे. माजी नगरसेविका सुरेखा भोसले व ॲड. वैशाली भोसले यांनी वाहनतळासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काम प्रलंबित राहिले आहे. या भागात बहुमजली वाहनतळ उभे राहिल्यास शहरातील मुख्य बाजारपेठ व मध्यवस्तीतील बाजारपेठेत होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल. त्यामुळे वाहनतळाच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे व सचिव किशोर वडनेरे यांनी केली.

car parking
Increased Encroachment in City : वाढतं अतिक्रमण वाहतूक कोंडीचं कारण ठरतंय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.