Dasara Festival 2022 : गृहोपयोगी वस्‍तूंना मागणी; Electronic बाजारपेठेत चैतन्य

Electronic shop reference image
Electronic shop reference imageesakal
Updated on

नाशिक : विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. दसरा हा सण अत्‍यंत शुभ दिवस असल्‍याने या दिवशी नवीन वस्‍तुंची खरेदी केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स वस्‍तूंच्या बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे. ग्राहकांकडून गृहपयोगी वस्तूंना मागणी असल्याचे दिसून येत आहे. (Demand for household items Vitality in Electronic Market on Dasara Festival 2022 Nashik Latest Marathi News)

Electronic shop reference image
Durga Puja Utsav 2022 : गांधीनगरला दुर्गापूजा उत्सवाला सुरवात

मुख्य बाजारपेठेतील इलेक्ट्रॉनिक्स वस्‍तूंच्या दुकानातील ग्राहकांची चौकशी तीन ते चार दिवसापासून सुरू आहे. तसेच दसऱ्याला मुहूर्त साधत ग्राहक वस्‍तू घरी नेणार आहेत. ग्राहकांची गृहोपयोगी वस्‍तूंमध्ये ज्‍यूसर, फ्रिज, टीव्ही, ओव्हन याकरिता विशेषतः महिला वर्ग तसेच नवीन दांपत्‍य खरेदीसाठी उत्‍सुक आहेत. तसेच ग्राहकांची विशेष पसंती प्रसिद्ध कंपनीच्या प्रॉडक्टकरिता जास्‍त आहे. जेणेकरून गॅरंटी व वॉरंटी कालावधी विचारात घेऊन तसेच वस्‍तूंकरिता मिळणारी सेवा सहजतेने उपलब्‍ध होते.

खरेदीचा मुहूर्त

विजय मुहूर्त, खरेदीसाठी सर्वोत्तम - दुपारी २ ते ४
लाभ घडी मुहूर्त, खरेदीसाठी योग्य सायंकाळी- ५ ते ६.३०
शुभ आणि अमृत घडी, सर्वोपयोगी मुहूर्त रात्री- ८ ते ११
लाभ आणि अमृत घडी, भूमिपूजन, पायाभरणी, नवीन शुभारंभसाठी उत्तम- सकाळी ७ ते १०

"खरेदीसाठी ग्राहकांची पसंती समाधानकारक आहे, दसऱ्यानिमित्‍त खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल. गृहपयोगी वस्‍तूत ज्‍यूसर, ओव्हन यासाठी महिलांची विशेष पसंती आहे. तसेच ४५ ते ५० इंच एलईडी टीव्हीसाठी मागणी आहे." - जयश्री बेलगावकर, व्यावसायिक, मेनरोड

Electronic shop reference image
Navratri 2022 : देवीचा पालखी सोहळा अन् नगरप्रदक्षिणा; गडावर फडकणार कीर्तिध्वज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.