नाशिक : शहर बससेवेचा तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंक कंपनीकडून पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून शहर बससेवा चालविली जाते. सद्यःस्थितीत शहरातील रस्त्यांवर अडीचशे बस चालविल्या जातात. (Demand for provision of 85 crores to cover losses of Citylinc Nashik News)
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
एका बससाठी प्रतिकिलोमीटर ७५ रुपये खर्च होतो, मात्र तिकीट विक्रीतून ४५ रुपये प्रतिकिलोमीटर महसूल सिटीलिंक कंपनीला मिळतो. जवळपास ३० रुपयांचा तोटा प्रतिकिलोमीटरला सहन करावा लागत आहे.
२०२१ व २२ या आर्थिक वर्षात २० कोटी २१ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर २५ टक्के पासच्या दरात वाढ करण्यात आली. २०२२ व २३ मध्ये सिटीलिंक कंपनीने तोटा भरून काढण्यासाठी महापालिकेकडे ७० कोटी रुपयांची मागणी नोंदवली होती.
परंतु, महापालिकेने अंदाजपत्रकात ५० कोटी रुपयांची तरतूद केली. आता २०२२ व २३ मध्ये ७० कोटी रुपयांपर्यंत तोटा जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी नोंदविण्यात आल्याचे समजते. बसचा तोटा कमी करण्यासाठी ५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.