अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावपरीसरात मोसम नदीनजीक असलेल्या गावठाण हद्दीत नामपूरच्या डंपिंग ग्राऊंडमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सदर डंपिंग ग्राऊंडचे स्थलांतरीत करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरत ग्रामस्थांनी निवेदन सादर केले आहे. (Demand for relocation of citizens due to dumping ground endangering health nashik news)
निवेदनातून मोराणे सांडस येथील गावठाण हद्दीत नामपूर गावातील प्लास्टिक कचरा, घाण, पोल्ट्री फाॅर्ममधील मृत कोंबड्या, आजूबाजूलाच असलेल्या मंगल कार्यालयातील उष्टे अन्न पत्रावळी व मृत जनावरांची अवशेष टाकली जात आहेत. सदर कचरा टाकू नये याबाबत वेळोवेळी सुचना देण्यात आल्या असूनदेखील गावठाण हद्दीत कचरा टाकणे सुरूच आहे.
सदर डंपिंग ग्राऊंडमधील मृत जनावरे व कोंबड्यांवर डल्ला मारण्यासाठी भटकी कुत्रे असतात. याच डंपिंग ग्राऊंडजवळून मोराणे सांडस गावाला जोडणारा रस्ता व काही अंतरावर महाविद्यालय असून शालेय शिक्षण घेण्यासाठी लहान-मोठे विद्यार्थी नेहमीच ये-जा करीत असतात.
या कुत्र्यांवर अंकुश नसल्याने विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे तसेच गावातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डंपिंग ग्राऊंडनजीकच तालुका क्रीडा संकुल व गावठाण जागेतील नवीन प्लाॅट निर्माण केली आहेत.
यामुळे या डंपिंग ग्राऊंडचे स्थलांतरीत करावे असे म्हटले आहे. याबाबत नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच रत्ना मोरे, उपसरपंच गंगाधर शेवाळे, महेंद्र शेवाळे, शांताराम पिंपळसे, विजयाबाई गांगुर्डे व ग्रामसेवक धीरज कापडणीस यांना ग्रामस्थांकडून निवेदन सादर करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.