नाशिक : जीर्ण वृक्षांचे सर्वेक्षण करून तोडण्याची मागणी

old & crooked tree
old & crooked treeesakal
Updated on

लखमापूर (जि. नाशिक) : वणी- नाशिक या दुय्यम दर्जाच्या महामार्गावर (Highway) आजही जीर्ण झालेले झाडे तशीच उभी आहेत. गतवर्षां वलखेड गावाजवळील असेच एक झाड (Tree) कारवर पडल्याने तीन शिक्षकांना प्राण गमवावे लावले होते. अशा अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पावसाळ्यापुर्वी (Pre Monsoon) अशी झाडे तोडण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. बांधकाम विभागाने (construction department) याची दखल घेत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. (Demand for survey and cutting down of old trees Nashik News)

दिंडोरी तालुक्यातील वणी नाशिक हा रस्ता दळणवळणांच्या माध्यमांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याने नाशिक, वणी, गुजरात व महत्त्वाच्या गावांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याची सध्याची स्थिती चांगला रस्ता म्हणून गणली जाते. परंतु पावसाळ्यात या रस्त्यांला गाड्या घसरगुंडीचे ग्रहण निर्माण होत पावसाळ्यात अनेक छोटे मोठे वाहने रस्ता गुळगुळीत असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर घसरगुंडी होऊन अनेक अपघात मागील पावसाळ्यात झालेले दिंडोरीकर जनतेने पाहिले आहे. त्यात दुसरे संकट म्हणजे रस्त्यांच्या कडेला असणारी जीर्ण झालेली झाडे. या जीर्ण झाडांमुळे वलखेड फाट्याजवळ चार चाकी वाहनांवर वाळलेले झाड आदळून तीन निष्पाप शिक्षकांना आपल्या प्राणांला मुकावे लागले होते. काही शिक्षक गंभीर जखमी झाले होते. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असणारे वाळलेले झाडे पाणी जिरल्याने मोडतात व कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळतात. त्यामुळे रस्त्यावर मोठे अपघात होतात.

old & crooked tree
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला 75 वर्ष पूर्ण; स्थानकात बसचे पूजन

वणी नाशिक रस्त्यावर आजही काही ठिकाणी वाळलेली झाडे आढळत येतात. त्यांची संबंधित विभागांने पाहणी करून ते वाळलेले झाडे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तोडावे, जेणेकरुन पावसाळ्यात अपघात होणार नाही व प्रवासी वर्गाचा प्रवास सुखरूप होईल.

old & crooked tree
नाशिक : नवीन गटरचनेमुळे 'कहीं खुशी-कहीं गम'; राजकीय उलथापालथ

"रस्त्याच्या कडेला असणारी जीर्ण झाडे अपघातांला कारणीभूत होत असतात. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी अशा वाळलेल्या झाडांची संबंधित विभागाने पाहणी करून त्यांची तोडणी करावी, जेणेकरून भविष्यात अपघातांना निमंत्रण मिळणार नाही."

- रघुनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते वलखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.