Nashik Crime News : 50 लाख उकळूनही सावकाराकडून 20 लाखांची मागणी; गुन्हा दाखल

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : नऊ लाख रुपये खासगी सावकाराकडून व्याजाने घेतले असता, त्यापोटी ५० लाख ९० हजार रुपये परत करूनही २० लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी संबंधिताला ठार मारण्याची धमकी देत, त्यांच्या मुलीला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला.

या प्रकरणी संशयित विजय शंकर देशमुख (रा. रुंगटा एम्पोरिया, कर्मयोगीनगर, गोविंदनगर, नाशिक) असे संशयित खासगी सावकाराचे नाव आहे. दरम्यान, शहरात खासगी सावकारी धंद्याचे मोठे पेव फुटले असून, गेल्या काही दिवसांत खासगी सावकारीविरोधात सदरील तिसरा गुन्हा दाखल होत आहे. (Demand of 20 lakhs from moneylender despite paying 50 lakhs Filed case Nashik Crime News)

गेल्या महिन्यात पाथर्डी फाटा परिसरात खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून एका दांपत्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर पंचवटी परिसरात एका खासगी सावकाराने वसुलीचा तगादा लावत एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शहरात या दोन घटना नुकत्याच घडलेल्या असताना, आणखी एका खासगी सावकरीमुळे व्यावसायिक त्रस्त झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक सुरेश पुजारी (रा. श्रीराम चौक, राणेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विजय देशमुख याच्याकडून पुजारी यांनी हॉटेल व्यवसायासाठी पाच टक्के व्याजाने नऊ लाख रुपये घेतले होते. त्याचा परतावा करताना पुजारी यांनी ४४ लाख ९० हजार रुपये रोखीने, तर सहा हजार रुपये आरटीजीएसने दिले.

परंतु, तरी संशयिताने पुजारी यांच्या हॉटेलातील मॅनेजरला धमक्या दिल्या. पुजारी यांचा रस्ता अडवून पुन्हा वीस लाखांची मागणी केली. शिवाय पुजारी यांच्या मुलीला फोनवरून धमकी देत पैसे मागितले.

सदरचा प्रकार २००७ ते २०२२ या दरम्यान घडला आहे. पुजारी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सावकारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी निरीक्षक चंद्रकांत आहिरे हे तपास करीत आहेत. संशयिताची चौकशी करून पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Crime News
Nandurbar News : तब्बल ३७ वर्षांनंतर प्रशासकराज! तळोदा पालिकेचा कारभार प्रशासकांकडे

असा होता व्यवहार...

तक्रारदार पुजारी यांनी २००७ मध्ये एक लाख, २०१० मध्ये चार लाख, जानेवारी २०१८ मध्ये चार लाख असे नऊ लाख रुपये खासगी सावकार देशमुख याच्याकडून घेतले होते. यासाठी पाच टक्क्यांचा व्याजदर होता.

पुजारी यांनी २००७ ते २०२२ पर्यंत प्रतिमहिना व्याजाने पैसे परत केले. त्यानुसार ४४ लाख ९० हजार रोख व उर्वरित सहा लाख रक्कम ई-स्वरूपात देण्यात आलेली आहे. तरीही संशयिताने २० लाखांची मागणी केली.

Crime News
Health Department Recruitment : पीबी बीएसस्सी नर्सिंग उमेदवारांना डावलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.