Maratha Reservation : मराठा खासदार-आमदारांनी आंदोलनातून मार्ग काढावा; सकल मराठा समाजाची मागणी

जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील खासदार-आमदारांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली.
demand of Maratha community Maratha MP MLA should support agitation of manoj jarange patil
demand of Maratha community Maratha MP MLA should support agitation of manoj jarange patilSakal

Nashik News : मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे, सगेसोयरेचा अध्यादेश मान्य करून अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील खासदार-आमदारांनी उपोषणस्थळी जावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली.

पुन्हा आंदोलनाचा इशारा

जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील खासदार-आमदारांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही उपोषणस्थळी जावे अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजातील नेते आरक्षणासंदर्भात भूमिका घेत नसतील तर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com