NMC News: मिरची चौकातील डिमार्केशनला ‘नगररचना’चा खोडा! मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलेली प्रक्रिया खोळंबली

CM Eknath Shinde, NMC & Mirchi Hotel Accident
CM Eknath Shinde, NMC & Mirchi Hotel Accidentesakal
Updated on

NMC News : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिरची चौकातील अपघातानंतर येथील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु महापालिकेच्या नगररचना विभागाकडून अतिक्रमणे हटविण्यासाठी डीमार्केशन होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेशित केलेली प्रक्रिया खोळंबली आहे.

आता अतिक्रमण विभागाने चौथ्यांदा स्मरणपत्र दिल्याने ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे हटविण्यात नगररचना विभागाचा खोडा असल्याची बाब कागदावर आली आहे. (Demarcation in Chilli Chowk joke of NMC town planning department process ordered by CM shinde disrupted nashik news)

छत्रपती संभाजी महामार्गावरील हॉटेल मिरची लगत ऑक्टोबर २०२२ मध्ये बस अपघात होऊन १२ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत घटनास्थळी भेट दिली.

नाशिक शहरातील वाढत्या अपघातांची दखल घेऊन अपघात प्रवणक्षेत्रे अर्थात ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभागमहापालिका या सरकारी संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची रस्ते सुरक्षा समिती गठित करून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यात शहरांमध्ये २६ ब्लॅक स्पॉट असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. यातील सात अपघातस्थळावरील अतिक्रमणे तातडीने हटविणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.

महापालिकेकडून अपघातग्रस्त हॉटेल मिरची चौकातील अतिक्रमणे हटविण्यात आले. मात्र रस्त्याला लागून असलेल्या फॅनिंगमधीलच अतिक्रमणे हटविण्यात आली नाही. उर्वरित अतिक्रमणे हटविण्यासाठी डिमार्केशन होणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

CM Eknath Shinde, NMC & Mirchi Hotel Accident
NMC School Opening: पहिल्याच दिवशी सेवेत ‘स्मार्ट’ क्लासरूम! 68 शाळांमध्ये प्रकल्प

त्याअनुषंगाने अतिक्रमण विभागाने २३ जानेवारी २०२३, २० मार्च २०२३ तर ११ एप्रिल २०२३ रोजी असे तीन पत्रे दिले. आतापर्यंत नगररचना विभागाने एकाही पत्राची दखल घेतली नाही. त्यामुळे १२ जून २०२३ ला चौथे स्मरणपत्र सादर करण्यात आले.

फॅनिंगमधील अतिक्रमणे तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या हटविण्यासाठी डीमार्केशन करावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

हॉटेल मिरची चौकाबरोबरच निलगिरी बाग, जत्रा हॉटेल चौफुली, नांदूर नाका चौक, पाथर्डी फाटा, रासबिहारी चौक, बळी मंदिर चौक, तारवाला नगर सिग्नल या ठिकाणचेदेखील अतिक्रमणे हटविण्यासाठी डिमार्केशन करावे अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

मात्र अद्याप नगररचना विभागाकडून पत्रांची दखल घेतली जात नसल्याने अतिक्रमण हटविण्यात नगररचना विभागाकडून खोडा घातला जात असल्याचा आरोप होत आहे.

"महापालिकेच्या नगररचना विभागाला यापूर्वी तीनदा स्मरणपत्र देऊन डिमार्केशन करावे अशी मागणी केली आहे. आता चौथ्यांदा पत्र दिले आहे."

- करुणा डहाळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग.

CM Eknath Shinde, NMC & Mirchi Hotel Accident
NMC Water Tap Connection: अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाचा प्रयोग फसला! 45 दिवस मुदतवाढ देण्याची नामुष्की

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.