Nashik News: आमदार सरोज अहिरे विरोधात मोर्चेबांधणी; डॉ. अहिरराव यांच्या राजीनाम्यानंतर चौरंगी लढतीचे संकेत

Saroj Ahire, Laxman Mandalay, Yogesh Gholap, Rajshree Ahirao
Saroj Ahire, Laxman Mandalay, Yogesh Gholap, Rajshree Ahiraoesakal
Updated on

Nashik News : सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षाकडून सुरू असली तरी नाशिक जिल्ह्यात मात्र लोकसभेबरोबरच विधानसभेची तयारीदेखील तयारी सुरू झाली आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांच्याविरोधात तहसीलदार पदावरून राजीनामा दिलेल्या डॉ. राजश्री अहिरराव रिंगणात उतरणार आहे.

यापूर्वी माजी आमदार योगेश घोलप व राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण मंडाले हेदेखील मैदानात उतरणार असल्याने चौरंगी लढत देवळालीत सध्यातरी अटळ मानली जात आहे. (Demonstration against MLA Saroj Ahire Dr After Ahirraos resignation there indications of four way fight Nashik News)

पुढील वर्षी एप्रिल व मेमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभेबरोबरच विधानसभेचीदेखील तयारी सुरू झाली आहे. घोलप कुटुंबीयांच्या गडाला सरोज अहिरे यांनी खिंडार पाडले.

त्या दिवसापासूनच देवळालीमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पाच टर्म या मतदारसंघातून माजी मंत्री बबन घोलप निवडून आले. त्यानंतर न्यायालयाच्या एका निकालामुळे घोलप यांना निवडणूक लढविता आणली नाही.

त्याऐवजी मुलगा योगेश यांनी निवडणूक लढविली व पाच वर्ष आमदार म्हणून काम पाहिले. मात्र पाच वर्षात योगेश यांना कामाची छाप पाडता आली नाही व मतदारांपर्यंत पोचता आले नाही.

परिणामी नगरसेवक असलेल्या नवख्या सरोज अहिरे यांनी वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवली व जिंकल्यादेखील. सध्या या मतदारसंघात अनेकांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

Saroj Ahire, Laxman Mandalay, Yogesh Gholap, Rajshree Ahirao
NCP: भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रवींद्र बांदल यांची निवड

भूमिकेबाबत स्पष्टता...

घोलप यांच्याकडून आधीपासूनच तयारी सुरू आहे. बबन घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्याअनुषंगाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वदेखील शिवसेनेकडून त्यांना देण्यात आले होते.

परंतु माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर घोलप यांनी नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविला. त्यानंतर मात्र घोलप यांनी ‘यू टर्न’ घेतला व घोलप हे शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्येदेखील दिसून आले.

योगेश घोलप यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. परंतु तेदेखील शिवसेनेच्या कार्यक्रमात दिसून आल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल अद्यापही स्पष्टता नाही.

परंतु, असे असले तरी योगेश घोलप हेच देवळालीमधून निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले यांनी तयारी सुरू केली आहे.

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मतदारांच्या भेटी घेणे सुख- दुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होणे, कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी घेणे असे कार्यक्रम त्यांनी सुरू केले आहे.

या विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल, असे बोलले जात असतानाच तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांची एंट्री जवळपास निश्चित झाली आहे.

तहसीलदारपदाचा राजीनामा

डॉ. अहिरराव २०१९ च्या निवडणुकीतच या मतदारसंघातून उभे राहण्याच्या प्रयत्नात होत्या. त्याअनुषंगाने त्यांनी रेशनकार्ड शिबिर व शासकीय योजना लोकांपर्यंत पोचवण्याची मोहीम हाती घेतली होती.

परंतु उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत त्यांच्याकडून कुठलीच हालचाल झाली नाही, मात्र आता २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांनी शर्थीने प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तहसीलदारपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.

निवडणुकीबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी निवडणुकीत उभे राहण्यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याचे त्यांचे जवळचे कार्यकर्ते सांगत आहे.

"मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेल."- राजश्री अहिरराव, तहसीलदार, नाशिक.

Saroj Ahire, Laxman Mandalay, Yogesh Gholap, Rajshree Ahirao
NCP’s Rohit Pawar suspends Yuva Sangharsh Yatra: रोहित पवारांची मोठी घोषणा, स्थगित केली युवा संघर्ष यात्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.