Dengue Disease : डेंगीचा उद्रेक; तापाने शहर फणफणले

Dengue News
Dengue Newsesakal
Updated on

नाशिक : कधी उष्ण, तर कधी थंड अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम नाशिककरांच्या आरोग्यावर जाणवताना दिसत आहे. परिणामी शहरात दीड हजाराहून अधिक तापाचे रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, त्या पाठोपाठ डेंगी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु सदर आकडेवारी फक्त सरकारी रुग्णालयातील असून, खासगी रुग्णालयाकडून महापालिकेकडे माहिती पुरविली जात नसल्याने डेंगी रुग्णांची वास्तवातील संख्या समोर येत नाही.

Dengue News
SAKAL Exclusive : शहरात अनधिकृत मोबाईल टॉवरचा सुळसुळाट

मागील दोन वर्षे कोरोनामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. सध्या शहरातील कोविड सेंटरमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे जवळपास हा संसर्गजन्य आजार हद्दपार झाल्यात जमा आहे. मात्र, अन्य आजारांनी तोंड वर काढले आहे. कॉलरा, गॅस्ट्रो व हगवण या आजारांच्या रुग्णांची संख्या शून्य आहे. शहरात नोव्हेंबर महिन्यात डायरियाचे ४०० रुग्ण आढळून आले, तर विषमज्वाराचे दहा रुग्ण नोव्हेंबर महिन्यात आढळले.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १२२६ तापाचे रुग्ण आढळले. चिकूनगुनियाचा एक रुग्ण आढळला. स्वाइन फ्लूचे ऑगस्ट महिन्यात १०२ सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात १४ रुग्ण आढळले. त्या व्यतिरिक्त स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८२ डेंगी रुग्ण

या वर्षी जानेवारीत डेंगीचे पंधरा रुग्ण आढळून आले. फेब्रुवारी महिन्यात ११, तर मार्च महिन्यात दोन डेंगीचे रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यात सहा, तर मे महिन्यात अकरा रुग्ण आढळले. जुलै महिन्यात २३ ऑगस्ट महिन्यात ९९, तर सप्टेंबर महिन्यात १३९ डेंगी रुग्ण आढळून आले. ऑक्टोबर महिन्यात १४६, तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८२ डेंगी रुग्ण आढळले.

Dengue News
NMC : शालाबाह्य मुलांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण; विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेची बाब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.