Nashik ZP News: जि.प.चे विभागप्रमुख फिल्डवर; प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी तालुक्यांना भेटी

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik ZP News : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मुख्यालयातील सर्वच विभागप्रमुखांना फिल्डवर उतरविले आहे.

श्रीमती मित्तल यांनी विभागप्रमुखांची प्रत्येक तालुक्यास ‘तालुका पालक अधिकारी’ म्हणून नेमणूक केली आहे. हे अधिकारी तालुक्यात जाऊन, केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी व कल्याणकारी विविध योजना, अभियान अंमलबजावणीचा आढावा घेतील.

नेमणूक केलेले अधिकारी संबंधित तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जातील व आढावा घेतील. (Department Head of zp will visit taluks on second Tuesday of every month nashik news)

आढाव्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, विभागीय आयुक्त-जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन, विभागीय व जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती, लोकायुक्त व उपलोकायुक्त, आपले सरकार, PG Portal (CENTRALIZED PUBLIC GRIEVANCE REDRESS AND MONITORING SYSTEM CPGRAMS) महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग, राज्य माहिती आयोग, मंत्री व शासन यांच्याकडे करण्यात आलेले ग्रामस्यांचे निवेदन अर्ज तक्रारी, तसेच प्रलंबित निवृत्ती प्रकरणे यांचे वेळेत निराकरण करतील.

पंचायत समिती स्तरावर बैठक घेऊन मार्गदर्शन करतील. जिल्हा परिषद व पंचायत समिती यात दुवा म्हणून हे अधिकारी काम करतील, असेह श्रीमती मित्तल यांनी सांगितले.

Nashik ZP News
Maharashtra ZP Teacher Transfer: शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली होणार; बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा सुरू

तालुका पालक अधिकारी असे

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे (नाशिक), जलजीवन मिशन प्रकल्प संचालक दीपक पाटील (इगतपुरी), उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (त्र्यंबकेश्वर), जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) प्रताप पाटील (पेठ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ (सुरगाणा), कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे (दिंडोरी), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे (कळवण), कार्यकारी अभियंता पकंज मेतकर (बागलाण), शिक्षणाधिकारी (योजना) भगवान फुलारी (देवळा), प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव (चांदवड), जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाठ (मालेगाव), कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे (नांदगाव), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे (येवला), जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील (निफाड), मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण (सिन्नर).

Nashik ZP News
Nashik News: 12 वर्षीय श्रावणीने शोधला अंतराळात लघुग्रह; जागतिक स्तरावर संशोधन, अभ्यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.