NMC News: बेकायदेशीर फलकांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी विभागांवर

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : शहरातील बेकायदेशीर होर्डिंग, फलक व बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई नेमकी कुणी करायची याविषयी तोडगा निघाला आहे.

ज्या विभागाच्या हद्दीत फलकबाजी झाली असेल त्या विभागानेच थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (Departments responsible for filing cases on illegal boards nmc nashik)

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी प्रस्तावास नुकतीच मान्यता दिली आहे. चौकाचौकांमध्ये फलक लावून ‘नेतेगिरी’ थांबवण्यासाठी त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

परंतु, ही कारवाई नेमकी कुणी करावी याविषयी महापालिका अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. केवळ अतिक्रमण विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल करायचा म्हटले तर या विभागाला दररोज पोलिस ठाण्यात जावे लागेल.

त्यामुळे हा विभाग फक्त अतिक्रमण मोहीम राबवेल. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संबंधित विभागाकडून केली जाणार आहे. नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा वाढदिवस, सण, उत्सव व इतरही समारंभाच्या अनुषंगाने विविध संघटना, राजकीय पक्षांचे भाऊ, नानांचे फलक रात्रीतून उभे राहतात. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली जात नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
Nashik Accidental Black Spot: शहरातील 26 ब्लॅक स्पॉट रडारवर; ऑक्टोबरमध्ये 106 ठिकाणी धडक कारवाई

याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. यामुळे राज्य शासन व न्यायालयाचे आदेश केवळ कागदावरच राहतात. मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून अनेकदा होर्डिंग उतरवून ते जमा केले जातात. मात्र गुन्हे दाखल होत नसल्याने अनेकांचे फावते. यापुढे त्यांच्या ‘भाईगिरी’ला चाप बसण्यास मदत होणार आहे.

गुरुजीही चढणार ठाण्याची पायरी

अतिक्रमण विभागाने उपायुक्त नितीन नेर यांनी तयार केलेल्या प्रस्तावास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यात शाळेच्या आवारात जर कुणी फलक लावला तर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.

त्यामुळे महापालिका विभागातील कर्मचाऱ्यांसह गुरुजींनाही आता पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागणार आहे.

NMC Nashik News
NMC News: गणेशमूर्ती आमची आणि किंमत तुमची! महापालिकेतर्फे अभिनव संकल्पना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.