Nashik: देशी वृक्षांच्या वाढीसाठी उद्यान विभागाकडून डिपॉझिट! पुढील वर्षासाठी NMC नर्सरीत तयार करणार 1 लाख रोपे

NMC News
NMC News esakal
Updated on

Nashik News : शहरात देशी वृक्ष झपाट्याने कमी होत असून, नागरिकांच्या मागणीनंतरही देशी लागवडीची रोपे मिळत नाही. त्यामुळे पुढील वर्षासाठी महापालिका स्वमालकीच्या जेतवननगर येथील रोपवाटिकेत एक लाख रोपे तयार करणार आहे.

नागरिकांना अनामत रकमेच्या बदल्यात रोपांचे वाटप करून शहरात देशी झाडांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उद्यान विभागाचे अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली. (Deposit from Parks Department for growth of indigenous trees 1 lakh saplings to be produced in NMC nursery for next year Nashik)

महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत महापालिकेच्या २६० चौरस मीटर क्षेत्रात जवळपास ४९ लाख वृक्षे आढळली आहेत. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. परंतु वृक्षसंपदा अधिक असली तरी त्यात देशी झाडांचे प्रमाण कमी आहे.

निलगिरी, गुलमोहर, बूच, रेन ट्री, पॅपोरिया या धोकादायक वृक्षांची संख्या अधिक आहे. २०२० मध्ये वृक्षगणनेच्या अंतिम अहवालानंतर वृक्षगणना झाली नाही.

कोरोनाकाळातही गणना झाली नाही. आता नव्याने वृक्षगणना होणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

अंतिम वृक्षगणनेनंतर देशी वृक्षांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर नागरिकांकडून महापालिकेच्या नर्सरीकडे सातत्याने देशी वृक्षांची मागणी झाली. परंतु अशी झाडे महापालिकेकडे नव्हती.

शहरातील नर्सरीचालकांकडूनही देशी झाडांचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे देशी एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

जेतवननगर येथे महापालिकेची नर्सरी आहे. त्यात देशी वृक्षांची रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत एक लाख रोपे तयार करून ती नागरिकांना दिली जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
Jalyukta Shivar Abhiyan: ‘जलयुक्त शिवार’चा 204 कोटींचा आराखडा! निधी उभारण्याचा प्रश्न

शहरातील वृक्षसंपदा

शहरात जवळपास ४९ लाख वृक्षसंपदा आहे. पंचवटी विभागात सर्वाधिक ३६.५४ टक्के, सिडको विभागात ३३ टक्के वृक्ष आढळले.

एकूण वृक्षांपैकी सरकारी जागेवर २७ लाख दहा हजार ४६७ वृक्ष असून, खासगी व इतर जागेवर वीस लाख ८४ हजार ९२० वृक्ष आहेत. पंचवटी विभागात १७ लाख ५२ हजार १७७ आहे. सिडको विभागात पंधरा लाख ८५ हजार ६१८ वृक्ष आढळली.

नाशिक रोड विभाग वृक्षसंपदेबाबत तिसऱ्या स्थानावर आहे. येथे आठ लाख १८ हजार १८ वृक्ष आहेत. पूर्व विभागात १.४० टक्के सर्वांत कमी वृक्ष आहेत. पश्चिम विभागात १.४६ टक्के वृक्ष आहेत.

या वृक्षांची होणार लागवड

वड, पिंपळ, उंबर, मोहा, चिते, बेल, हिरडा, बेहडा, अमलतास, कवट, आंबा, आवळा, बांबू, करंज, पापडा, हळद, कळंब.

डिपॉझिट पद्धत

देशी वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी त्या प्रकारच्या झाडांची उपलब्धता गरजेची आहे. त्यामुळे नागरिकांना देशी वृक्ष लागवडीसाठी डिपॉझिट सिस्टिम सुरू केली जाणार आहे.

यात पन्नास ते शंभर रुपये संबंधितांकडून डिपॉझिट स्वरूपात घेतले जाणार आहे. सहा महिन्यांनंतर लावलेल्या वृक्षाचे छायाचित्र दाखवून डिपॉझिट रक्कम परत दिली जाणार आहे.

"महापालिका हद्दीत देशी वृक्षांची संख्या झपाट्याने घटत असून, देशी वृक्षलागवडीसाठी महापालिका स्वतःच्या नर्सरीत एक लाख रोपे तयार करणार आहे. पुढील वर्षात पावसाळ्यापूर्वी देशी रोपांचे डिपॉझिट सिस्टिमवर वाटप केले जाणार आहे."

- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका

NMC News
Nashik : आरोग्य कुटुंबकल्याण जनजागृती किट सापडले वादात! कीट परत घेण्याची विविध संघटनांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.