नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

devendra fadnavis latest news
devendra fadnavis latest newsesakal
Updated on

नाशिक : आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्‍न चर्चेत आलेला असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डेदेखील विधानसभेत गाजले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना देताना टोल बंद करण्याचा इशारा दिल्याने गणेशोत्सवासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (Deputy Chief Minister assurance to fill potholes on Nashik Mumbai highway Nashik latest marathi news)

नाशिकहून मुंबई, ठाणे शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त हजारो लोक ये-जा करतात. त्याचबरोबर धुळे, जळगाव येथील नागरिकदेखील वीकेंडला मुंबईत ये-जा करतात. परंतु, दोन महिन्यांत महामार्गावरील वाहतूक मंदावली असून, रेल्वे प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

नाशिकहून मुंबईकडे जाताना वाडीवऱ्हे फाटा, गोंदे येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. घोटीत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच वाहनांची गती मंदावते, त्यात खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इगतपुरी बाहुली धरण फाट्यापासून घाटनदेवी मंदिरापर्यंत खड्डेच खड्डे आहेत.

पुढे कसारा घाट ओलांडल्यानंतर महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक ठप्प आहे. पुढे खडकी, शहापूर, आसनगाव, पडघा ओलांडल्यानंतर कल्याण फाट्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना खड्डेच खड्डे असल्याने मुंबई- ठाण्याचा प्रवास दीड तासाने वाढला आहे.

पुणे एक्स्प्रेस हायवे संदर्भात चर्चा होत असताना नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा विषय विधानसभेत निघाला. त्या वेळी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देताना खड्डे न बुजविल्यास टोल बंद करण्याच्या सूचना दिल्या.

devendra fadnavis latest news
Crime update : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

पुण्याला एक, नाशिकला वेगळा न्याय

पुणे-मुंबई महामार्गावरील मीसिंग लिंक शोधून पर्याय निर्माण करण्याच्या सूचना देतानाच, तसेच महामार्ग विस्तारीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, नाशिक महामार्गाचे विस्तारीकरणही आवश्‍यक आहे.

कल्याण फाटा ते ठाण्यापर्यंत दहापदरी महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. नाशिक ते कल्याणदरम्यान दहापदरी महामार्ग विस्तारीकरणाची आवश्‍यकता असताना नाशिक-मुंबई महामार्ग विस्तारीकरणासंदर्भात निर्णय न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

devendra fadnavis latest news
Nashik : 'SMBT'त वळताय परदेशी विद्यार्थ्यांची पावले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.