Nashik News : शिक्षण उपसंचालक कार्यालयाला २० एप्रिलला कुलूप ठोकणार असल्याचे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात सोमवारी (ता. १०) सहाय्यक शिक्षण संचालक एल. डी. सोनवणे आणि वेतन व भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाचे अधीक्षक उदय देवरे यांच्यासह शिक्षणाधिकारी कार्यालयात पत्र दिले आहे. (Deputy Director of Education office will locked on April 20 Secondary Education Associations letter to administration Nashik news)
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
पत्र देताना महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव शालीग्राम भिरूड, नाशिक विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आर. डी. निकम, जळगाव महानगर जिल्हा टीडीएफ अध्यक्ष एस.के. पाटील, मालेगाव महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह रईस अहमद, जमजम संस्था मालेगावचे अध्यक्ष जेऊर जमजम,
नाशिक महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर, एनडीएसटीचे संचालक संग्राम करंजकर, एनडीएसटीचे माजी अध्यक्ष संजय देवरे आदी उपस्थित होते. आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे,
असे आवाहन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे समन्वयक नीलेश ठाकूर, प्रदीपसिंह पाटील, त्र्यंबक मार्तंड, राजेंद्र शेळके, मालेगाव जिल्हा महानगर टीडीएफचे अध्यक्ष एन.के. बोरसे आदींनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.