Nashik News : नाशिकला कारागृहाचे उपमहानिरीक्षक; उत्तर महाराष्ट्रातील कारागृहांचा समावेश

Nashik Road Central jail
Nashik Road Central jailesakal
Updated on

Nashik News : छत्रपती संभाजीनगर येथे कारागृहाचा मध्य विभाग असून, शासनाने या मध्य विभागाचे विभाजन केले आहे. कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग हे नवीन कारागृह प्रादेशिक कार्यालय निर्मितीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली.

यामुळे पुणे येथील कारागृह उपमहानिरीक्षक हे पद आता नाशिक येथील स्वतंत्र कारागृह प्रादेशिक कार्यालयासाठी वर्ग करण्यात आले आहे. (Deputy Inspector General of Prisons Nashik Division approves creation of new Prisons Regional Office news)

कारागृह विभागाचा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होता. या मध्य विभागाचे शासनाने विभाजन करीत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे नवीन कारागृह प्रादेशिक कार्यालय सुरू होत आहे.

या कार्यालयांतर्गत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अहमदनगर ही जिल्हा कारागृहे, विसापूर खुले जिल्हा कारागृह, किशोर सुधारालय (नाशिक) ही कारागृहे समाविष्ट असतील.

त्याचप्रमाणे, पुणे येथील कारागृह उपमहानिरीक्षक हे पद आता नाशिक येथे होणाऱ्या स्वतंत्र प्रादेशिक कार्यालयासाठी वर्ग करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी पदे वर्ग करण्यासही मान्यता देण्यात आल्याचे शासनाचे उपसचिव विनायक चव्हाण यांच्या आदेशात म्हटले आहे.

Nashik Road Central jail
Nashik News : जिल्ह्यातील 797 ग्रामपंचायती जीईएम पोर्टलवर; राज्यात पोर्टलवर नोंदणीत नाशिक आघाडीवर

असे असेल पदस्थापन

० कारागृह उपमहानिरीक्षक

० स्वीय सहाय्यक (१)

० कार्यालयीन अधीक्षक (१)

० तुरुंगाधिकारी (२)

० पोलिस उपनिरीक्षक (१)

० वरिष्ठ लिपिक (२)

० लिपिक (५)

० कारागृह शिपाई (५)

० लघुलेखक (१)

० चपराशी (२)

एकूण २०

Nashik Road Central jail
Nashik News : जिल्ह्यातील 797 ग्रामपंचायती जीईएम पोर्टलवर; राज्यात पोर्टलवर नोंदणीत नाशिक आघाडीवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()