Nashik News: आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकाच्या आराखड्यास उपमुख्यमंत्री पवारांच्या बैठकीत मान्यता

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या स्मारकाच्या कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती.
Design of pioneer tribal revolutionaries Raghoji Bhangre memorial approved in meeting of Deputy CM Ajit Pawar Nashik News
Design of pioneer tribal revolutionaries Raghoji Bhangre memorial approved in meeting of Deputy CM Ajit Pawar Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : स्वातंत्र्य सेनानी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी ता. इगतपुरी येथील स्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. (Design of pioneer tribal revolutionaries Raghoji Bhangre memorial approved in meeting of Deputy CM Ajit Pawar Nashik News)

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या स्मारकाच्या कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती.

त्यामुळे काल २८ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबई येथील मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, दिलीप वळसे पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, मंजुळा गावित, नितीन भुसारा, वित्त विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद श्री. देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून स्मारक मंजूर झाले आहे. यासंदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८८ कोटी ८४ लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काम करण्यासाठी ९६ कोटी रुपये इतक्या रकमेस मंजुरी देण्याचे निश्चित झाले होते.

त्याचबरोबर या स्मारकाच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या कळसूबाई शिखरावर ये-जा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली.

त्यानुसार त्याचा २११ कोटी रकमेचा स्वतंत्र डीपीआर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठविण्यात यावा, असा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला होता.

यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा झाली. त्यामुळे स्मारकाचा सर्व खर्च सुमारे ४८३ कोटी रुपयांपर्यंत करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे.

Design of pioneer tribal revolutionaries Raghoji Bhangre memorial approved in meeting of Deputy CM Ajit Pawar Nashik News
Nashik: कोकाटेंच्या मागणीनुसार राघोजी भांगरे स्मारक कामासंदर्भात गुरुवारी उपमुख्यमंत्री पवारांच्या दालनात बैठक

आदिवासींच्या भावनेचा प्रश्न...

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे आदिवासी समाजात खूप मोठे स्थान आहे.

त्यामुळे झारखंड येथील बिरसा मुंडा स्मारकाच्या धर्तीवर हे स्मारक भव्यदिव्य बनवावे अशी आग्रही मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी या बैठकीत केली. त्यास उपमुख्यमंत्री पवार यांनी तात्काळ मंजुरी दिली.

आदिवासी विकास विभागामार्फत काम व्हावे...

या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आदिवासी विभागामार्फत करण्याचे या बैठकीत ठरले आहे. स्मारकाच्या कामकाजासाठी एक समिती बनविण्याचे ठरले असून त्यात पर्यटन व ग्रामविकास सचिव, वास्तुविशारद, आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, जिल्हाधिकारी या समितीत असणार आहेत.

कामाला गती मिळणार...

"राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामास निधी कमी पडू नये व कामातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्या दालनात बैठक घेण्याची आग्रही मागणी मी केली होती. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. आदिवासी बांधवांची अस्मिता या स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणारच आहे, मात्र या भागात पर्यटनवृद्धी होऊन या बांधवांना रोजगारही मिळणार आहे."

- माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर विधानस

Design of pioneer tribal revolutionaries Raghoji Bhangre memorial approved in meeting of Deputy CM Ajit Pawar Nashik News
Nashik News : भाराभर पक्ष अन्‌ राजकीय अस्तित्व शून्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.