Nashik News : सिडको भागातील एका बालकाचा रेबीजची लागण झाल्याने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर तोडफोड झाली. या घटनेची दखल घेत महापालिका आयुक्तांनी तातडीने मागील पाच वर्षात श्वान चाव्याची माहिती मागविली. त्यात ८२,००० लोकांना कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागल्याची बाब समोर आली आहे.
मागील वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात १८, १०३ व्यक्तींवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. (Despite sterilization process number of dogs increased in city nashik news)
परिणामी पशुसंवर्धन विभाग आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरवर्षी हजारो कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची प्रक्रिया केली जाते. असे असताना श्वानांची संख्या कशी वाढते, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका हद्दीमध्ये भटक्या व मोकाट श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून २००७ पासून निर्देशिककरण मोहीम राबवली जाते. मागील सोळा वर्षात या मोहिमेवर सरासरी दोन ते अडीच कोटी खर्च लक्षात घेता चाळीस कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
आतापर्यंत १ लाखाहून अधिक श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी श्वानांची संख्या मात्र वाढत आहे. सिडको विभागातील खुटवडनगर येथे एका मुलाला कुत्रा चावला. संबंधित मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. रेबीज आजारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला.
यादरम्यान रुग्णालयात तोडफोडदेखील झाली. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी श्वान चाव्याबाबत माहिती मागवली. मागील पाच वर्षात कुत्र्यांनी हल्ले चढवले असले तरी श्वानांच्या चाव्यामुळे एकही मृत्यू झाला नाही ही बाबदेखील अधोरेखित करण्यासारखी आहे. चाव्यानंतर तातडीने लस दिल्याने मृत्यूची एकही घटना घडली नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.
''मोकाट व भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून शहरात आता दोन मक्तेदारांची नियुक्ती केली जाणार आहे. या माध्यमातून अनेक अधिक श्वान पकडून निर्बीजीकरण केले जाईल.''- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.
पाच वर्षातील घटना
वर्ष श्वानदंश
२०१९-२० १६, २१७
२०२०-२१ ११, १४५
२०२१-२२ १५, ७७७
२०२२-२३ २०, ७७५
डिसेंबर २०२३पर्यंत १८, १०३
एकूण ८२, ०१७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.